Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

वी दिल्ली : देशातील नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला कथित महाघोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेविरोधात देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे तरुण आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

या आंदोलनाच्या ठिकाणी राजू शेट्टी व रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेऊन लढ्याला पाठिंबा जाहीर केला. (Shetti and Jankar extend support to the student protest)

बळीराजा, जनता विद्यार्थ्यांच्या पाठिशी

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारने आपला घमंड आणि अहंकार बाजूला ठेवावा. देशाच्या भवितव्याशी, म्हणजेच या निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही. सरकारच्या इशा-यावर ज्यापध्दतीने पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मारहाण केली आहे हे हदय पिळावून टाकणारे आहे. या परीक्षा घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. देशातील बळीराजा आणि संपूर्ण जनता या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.” (Shetti and Jankar extend support to the student protest)

वांगचुक यांना सक्रीय पाठिंबा

या आंदोलनाला देशातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आपला सक्रिय पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी २८ जूनपासून जंतर-मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती चिंताजनक असतानाही वांगचुक यांनी रुग्णालयातूनच आपले उपोषण पुढे सुरू ठेवले असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला आहे.

जेवणापासून ते वैद्यकीय सुविधांचा आंदोलनस्थळी मदत

जनसामान्यांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी देशभरातून हजारो विद्यार्थी एकत्र आले आहेत. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पेटून उठलेल्या या तरुणांना दिल्लीतील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी जेवणापासून ते वैद्यकीय सुविधेपर्यंतच्या सर्व आवश्यक गरजांची पूर्तता समाजातील विविध घटकांकडून स्वेच्छेने केली जात आहे. (Shetti and Jankar extend support to the student protest)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman