Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्र्यांचा विश्वास

शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Maharashtra Dinman 1 month ago

कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे इतिहास घडवतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यांच्या हक्कांसाठी प्रसंगी मध्यरात्रीही धावून जाणारा आणि शासनदरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारा कर्तृत्ववान प्रतिनिधी विधान परिषदेत पाठविण्याची ही महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्व शिक्षक आणि संस्थाचालकांनी एकजुटीने काम करून कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. (Chief Minister's appeal to ensure the victory of Kaustubh Gawade)

धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन येथे भाजपा-महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक व संस्थाचालकांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महामेळाव्याला राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कौस्तुभ गावडेंचे आश्वासन

शिक्षकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करताना उमेदवार कौस्तुभ गावडे म्हणाले, "शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. गरज पडल्यास रात्री बारा वाजताही मुख्यमंत्र्यांना फोन करून शिक्षकांचे काम करून घेईन. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन."

शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, प्रलंबित मागण्या, संस्थाचालकांच्या अडचणी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात समन्वय साधून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी काम करण्यावर त्यांनी भर दिला. (Chief Minister's appeal to ensure the victory of Kaustubh Gawade)

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गावडेंच्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीने उच्चशिक्षित, अभ्यासू आणि शिक्षण क्षेत्राची प्रत्यक्ष जाण असलेला उमेदवार दिला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत सक्षम आवाज मिळण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे मेळाव्यात अधोरेखित करण्यात आले.

कौस्तुभ गावडेंच्या विजयासाठी पराकाष्ठा करावी

शिक्षकांच्या अडचणी समजून घेणारा, त्यांच्या कामासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणारा आणि गरज पडल्यास कोणत्याही वेळी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी विधान परिषदेत असणे ही काळाची गरज आहे. कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि महायुतीची ताकद असल्याने त्यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचा निर्धार

.महामेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ, नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि भैया माने यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षक आणि संस्थाचालकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे, शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शासनाशी समन्वय साधणे आणि शिक्षकांचे हित जपणे यासाठी सक्षम प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षक मतदारांनी योग्य नेतृत्वाची निवड करून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याची संधी निर्माण करावी, असे आवाहनही करण्यात आले.

या महामेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, नामदार चंद्रकांतपाटील, समरजितसिंह घाटगे, आमदार अशोक माने, मंत्री हसन मुश्रीफ, भैया माने, प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, सुजय विखे पाटील, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, समित कदम आणि कृष्णराज महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Chief Minister's appeal to ensure the victory of Kaustubh Gawade)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman