Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीटीईटीची परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

सीटीईटीची परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

Maharashtra Dinman 5 months ago

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा' (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी त्याबाबतचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

७ फेब्रुवारीला त्यांची सीटीईटीची परीक्षा असताना त्यांना निवडणूकीसाठी ड्युटी लावण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. (Teachers exempted from election duty)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यामुळे ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ९ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशीच राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा होती. त्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. (Teachers exempted from election duty)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman