Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैभव सूर्यवंशीचे ५२ चेंडूत तुफानी द्विशतक

वैभव सूर्यवंशीचे ५२ चेंडूत तुफानी द्विशतक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशीने अशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत तुफानी द्विशतकाची नोंद केली. त्याने ५२ चेंडूत द्विशतक ठोकताना २८ षटकार आणि ७ चौकार मारले.

त्याच्या तुफानी खेळीने भारताने युएईचे २५० धावांचे आव्हान अवघ्या १४.२ षटकात पार केले. भारताने हा सामना सात गड्यांनी जिंकला. (Vaibhav Suryavanshi scores a double century off 52 balls)

वैभवने खेचले २८ षटकार

पाकिस्तान अ संघांकडून पराभूत झालेल्या भारतीय अ संघाला विजय महत्वाचा होता. प्रथम फलंदाजी करताना युएईने प्रथम फलंदाजी करताना २५० धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाची सलामीची जोडी वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरली. वैभव सूर्यवंशीने सुरवातीपासून धुवॉंधार फलंदाजी केली. १६ चेंडूत त्याने अर्धशतक पार केले. आणि २८ चेंडूत शतक पूर्ण केले. शतकानंतरही त्याचा खेळ बहरला. त्याने मैदानावर षटकारांची अक्षरश: बरसात केली. त्याने २८ षटकार खेचले. द्विशतक पूर्ण करताना त्याचा स्टाईक रेट ३८५ पेक्षा जास्त होता. युईएचे आव्हान अवघ्या १४.२ षटकात पूर्ण करत भारताने सात गड्यांनी सामना खिशात घातला. अभिषेक शर्माने १२ तर प्रभसिमरन सिंगने ३ धावा केल्या. रिंकू सिंग शून्य धावांवर नाबाद राहिला. (Vaibhav Suryavanshi scores a double century off 52 balls)

युएईच्या हरप्रितसिंग भाटियाचे शतक

युएने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद २४९ धावा केल्या. युएईच्या हरप्रितसिंग भाटियाने शतक ठोकत १३० धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. मुहम्मद शहदादने २८, इथन डिसोझाने २५ तर बासिल हमीदने ३६ धावा केल्या. भारताकडून अर्शद खानने चार गडी बाद केले. हर्षित राणा, सूयांश शेडगे, हर्ष दुबे, शाहबाज अहमदने प्रत्येकी एक बळी मिळवला.

सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम वैभवच्या नावावर

पुरुष लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम न्यूझीलंडच्या चॅड वोवेस यांच्या नावावर आहे. त्याने १०३ चेंडूत द्विशतक ठोकले होते. पण वैभव सूर्यवंशीने अवघ्या ५२ चेंडूत द्विशतक झळकावत न्यूझीलंडच्या बोवेसच्या नावावर असलेला विक्रम ५१ चेंडूनी मागे टाकला. सर्वात युवा द्विशतकवीर म्हणून वैभवची नोंद झाली. वयाच्या १५ वर्षे २४२ व्या दिवसांवर द्विशतकाची विक्रमी खेळी केली. (Vaibhav Suryavanshi scores a double century off 52 balls)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman