Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

वी दिल्ली : तब्बल २६ दिवसानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना वांगचुक यांनी उपोषण सुरू केले.

पण केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा दिल्या शिवाय जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेणार नाही असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलेआहे.

केंद्र सरकारकडून तीन अटी मान्य

केंद्र सरकारने वांगचुक यांच्या तीन अटी मागन्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. वीस जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. संसदेत नीट पेपरफुटी आणि देशातील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे या तीन अटी मान्य केल्या. (Wangchuk calls off hunger strike)

अभिजीत दीपकेंनी वांगचुक यांचे आभार मानले

वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांचे आभार मानत एक संदेश जारी केला. सोनम सर यांनी २६ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाच्या चेतनेला जागे केले. तुमचा जीव या देशासाठी अत्यंत मोलाचा आहे. तुमच्या धैर्यासाठी आणि त्यागासाठी खूप खूप धन्यवाद,"

आंदोलन सुरूच राहणार

वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. ते म्हणाले की, "जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलन असेच सुरु राहणार आहे." असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जंतरमंतवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. (Wangchuk calls off hunger strike)

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशातील सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील तरुणाई रस्त्यांवर उतरली. उपोषणस्थळ जंतरमंतरवरुन दिल्ली पोलिसांनी उपोषणाच्या २१ व्या दिवशी वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. केंद्र सरकारच्या या कृतीविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. हॉस्पिटलमध्येही त्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. (Wangchuk calls off hunger strike)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman