Dailyhunt
व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

वी दिल्ली : आखाती युद्धाचे पडसाद भारताला जाणवू लागले आहेत. चार राज्याच्या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान झाल्याने केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंदरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

१९ किलोच्या या व्यावसायिक सिलिंडरची दिल्लीमध्ये किंमत ३०७१.५० रुपये झाली आहे. या दरवाढीचा फटका गॅस सिलिंडरवर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या व्यवसायिकांना बसणार आहे. (Hike of ₹973 in commercial cylinder prices)

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा बसला आहे. पण घरगुती गॅस सिलिंडरवरही दरवाढीची टांगती तलवार राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Hike of ₹973 in commercial cylinder prices)

व्यावसायिक सिलिंडर दर वाढीचा फटका, हॉटेल्स, रेस्टारंट, धाबे, फूड स्टॉल, कॅटरिंग सेवेला बसणार आहे. तब्बल ९९३ दरवाढ झाल्याने खाद्य पदार्थाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Hike of ₹973 in commercial cylinder prices)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman