Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यजमान मेक्सिको, दक्षिण कोरियाची विजयी सलामी

यजमान मेक्सिको, दक्षिण कोरियाची विजयी सलामी

वी दिल्ली : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यजमान मेक्सिको आणि दक्षिण कोरिया संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय सलामी दिली. मेक्सिकोने दक्षिण अफ्रिकेचा २-० असा पराभव केला. तर पिछाडीवरुन येत आशियाई संघ दक्षिण कोरियाने झेकियावर २-१ असा विजय मिळवला.

गुरुवारी मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला सामना झाला. खचाखच भरलेल्या एस्टाडिओ अझ्केटा येथे झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला मेक्सिकोने २-० असे पराभूत करत विजयी सलामी दिली. या सामन्यात तीन खेळाडूंना रेड कार्ड मिळाली. (Winning starts for Mexico and South Korea)

मेक्सिकोचा नवव्या मिनिटाला गोल

सामन्याच्या नवव्या मिनिटाला दक्षिण अफ्रिकेचा गोलरक्षक आणि बचाव खेळाडूच्या चुकीच्या फायदा घेत फॉरवर्ड क्विनोनेसने सुरेख गोल करत यजमान मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. मध्यंत्तरास मेक्सिको संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धातील खेळावरही मेक्सिकन खेळाडूंचे वर्चस्व कायम ठेवले. ६६ व्या मिनिटाला जिमेनेझने हेडरवर गोल केला. त्याचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील ४६ वा गोल आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या स्पेफेलो सिथोले आणि थेमबा यांना रेडकार्ड मिळाल्याने दक्षिण अफ्रिकेच्या आशा मावळल्या होत्या. नऊ खेळाडूंशी दक्षिण अफ्रिकेने लढत दिली. मेक्सिकोचा बचावपटू सेझार मॉन्सटेसलाही रेड कार्ड दाखवून पंचानी मैदानाबाहेर काढले. (Winning starts for Mexico and South Korea)

पिछाडी भरुन काढत दक्षिण कोरियाचा विजय

फिफा वर्ल्ड कपमधील अ गटातील दुसरा सामना झेकिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. तब्बल वीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वर्ल्ड कपमध्ये उतरलेल्या झेकियाने दक्षिण कोरियाला चांगलेच रोखले. कोरियाचा सोन चा फटका गोलखांबावरुन गेला.

उत्तरार्धात झेकियाने ५९ व्या मिनिटाला गोलची कोंडी फोडली. झेकियाच्या व्लादिमिर कौफालच्या लांब थ्रोवर कर्णधार लादिस्लाव क्रेजीने सुरेख हेडरवर गोलची नोंद केली. त्यानंतर परतफेडीसाठी दक्षिण कोरियाच्या आघाडी फळीने जोरदार आक्रमणे केली. कोरियाचा मिडफिल्डर ह्यांग ईन बॉमने गोलरक्षक मातेज कोव्हारला चकवत चेंडू हळूवारपणे गोलजाळ्यात धाडत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

७७ व्या मिनिटाला फ्री क्रीकवर झेकियाच्या तोमास चासेकने सुरेख हेडरद्वारे चेंडू जाळ्यात धाडला. पण पंचानी ऑफसाईड दिल्याने झेकियाची आघाडीची संधी हुकली. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू ह्योन ग्युने चेंडूवर ताबा मिळवत जवळच्या पोस्टजजवळून चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. हाच गोल निर्णायक ठरल्याने दक्षिण कोरियाने विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. (Winning starts for Mexico and South Korea)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman