Wednesday, 05 Aug, 9.51 am महाराष्ट्र केसरी

होम
मुख्यमंत्रिपदावर असताना मुलीच्या मार्कांमध्ये निलंगेकरांनी बदल केला होता

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँगेसचे निष्ठावान नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा आज वयाच्या 89 व्या वर्षी मुत्यु झाला आहे. दोन दिवसांपुर्वी कोरोनावर मात करून आलेल्या निलंगेकरांनी पहाटे 2.30 च्या सुमारास प्राणज्योत मावळली. शिवाजीराव पाटील निलंगेकरांची आजही त्यांच्याबाबतही एक गोष्ट चर्चिली जाते ती म्हणजे त्यांच्या राजीनाम्याची. नक्की काय झालं होतं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता हे आपण पाहणार आहोत.

निलंगेकर 1985-86 या कालावधीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सर्वात कमी काळ ते मुख्यमंत्री म्हणून राहिले यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री सोडले तर निलंगेकर खूप कमी काळ मुख्यमंत्रिपदावर राहिले. त्यांना आपल्या मुलीमुळे राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा झालं असं होतं की, निलंगेकरांनी आपल्या मुलीचे एम डी परीक्षेत गुण वाढवून घेतले होते. निलंगेकरांचा असा कारभार समोर आल्यावर प्रकरण न्यालालयात गेलं आणि न्यायालयाने निलंगेकरांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावेळी निलंगेकरांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

निलंगेकरांचा मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यामध्ये राजकारणातले कट्टर विरोधक म्हणून आजोबा-नातू म्हणून निलंगेकरांचे नातू भाजपचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी निलंगेकर चर्चेत असायचे. या दोघांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.

दरम्यान, निलंगेकरांचा भारताच्या स्वातंत्र्यपुर्व काळातील स्वातंत्रलढ्यात समावेश होता. त्योसोबतच त्यांचा मराठवाड्याच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून लौकिक होता. पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वयाच्या 89 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोरोनाच्या उपचारानंतर 'या' व्याधींना तोंड द्यावं लागू शकतं; जाणून घ्या

अखेर तो दिवस आला, अयोध्यानगरी सज्ज झाली; आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन

'.नाहीतर अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील'; चीनची अमेरिकेला धमकी

.तेव्हा अमृता फडणवीसांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का?; रेणुका शहाणेंची मिसेस फडणवीसांवर टीका

पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Kesari
Top