Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आधुनिक कौशल्याशिवाय आयटी क्षेत्रामध्ये टिकता येणार नाही - डॉ. दीपक शिकारपूर

आधुनिक कौशल्याशिवाय आयटी क्षेत्रामध्ये टिकता येणार नाही - डॉ. दीपक शिकारपूर

पुणे - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत तसेच या क्षेत्रामध्ये स्टार्टअप म्हणजेच स्वतःचा बिझनेस सुरू करणाऱ्यांसाठीही भविष्य उज्वल आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला सतत आधुनिक कौशल्य आणि तंत्रज्ञान शिकणे गरजेचे आहे.

जुनं ते सोनं ही विचारसरणी या क्षेत्रामध्ये चालत नाही.नव ते हवं ही आता मानसिकता झाली आहे . हे ओळखून आधुनिक कौशल्य प्रत्येक तरुणाने आत्मसात केले पाहिजे. आधुनिक कौशल्याशिवाय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये टिकता येणार नाही अशी भावना ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केली.

एन एम डी इन्फोटेक सर्व्हिसेस या कंपनीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक शिकारपूर बोलत होते. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनाथ दरेकर, आमदार सत्यजित तांबे ,श्रॉफ ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे पी श्रॉफ, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील, अभिनेत्री ऋता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आदि यावेळी उपस्थित होते.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यांसारखे तंत्रज्ञान शिकले तर या क्षेत्रामध्ये सध्या निभाव लागू शकतो. अन्यथा तुम्ही काळाच्या ओघांमध्ये मागे पडू शकता हे लक्षात घेऊनच नवनाथ दरेकर यांनी एन एम डी इन्फोटेकच्या माध्यमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण देत आहेत ही काळाची गरज आहे.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले ,महाविद्यालयीन काळामध्ये मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संदर्भात उद्योग सुरू केला आणि आजही मी या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या गरजा मला माहिती आहे. माहिती कार्पोरेट आणि शिक्षण यामधील दरी भरून काढण्याचे काम एन एम डी संस्था करत आहे. संस्थेच्या माध्यमातून रोजगारक्षम तरुण निर्माण करणे , स्टार्ट अप च्या माध्यमातून उद्योजक निर्माण करण्यासाठी ही संस्था महत्वपूर्ण योगदान देत आहे.

काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी म्हणाले, भारताची लोकशाही मजबूत रहाण्यासाठी तरुणांनी व विद्यार्थ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. तरुण जर आपल्या हक्क आणि संधी संदर्भात जागरूक असतील तर त्यांच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. छोट्या खेडेगावातून पुण्यासारख्या शहरा मध्ये येऊन उद्योग व आयटी क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचे व तरूणाईमध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम 'नवनाथ मोहन दरेकर' अर्थात एनएमडी यांनी केले आहे त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे.

जे पी श्रॉफ म्हणाले, सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये तरुणांना संधी देण्याची महत्त्वपूर्ण काम नवनाथ दरेकर हे आपल्या कंपनीच्या माध्यमातून करत आहे. ध्येय ,ध्यास आणि ध्यान या त्रीसुत्री चा संगम नवनाथ दरेकर आणि त्यांच्या कंपनीमध्ये दिसतो त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कंपनीचे भविष्य उज्वल आहे.

नवनाथ दरेकर म्हणाले , एन एम डी इन्फोटेक सर्व्हिसेस च्या माध्यमातून दहा हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आम्ही शिक्षण दिले आहे तसेच 5000 विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये नोकरी आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी आम्ही संधी देऊ शकलो. यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समाधान वाटते हेच आमचे यश आहे. भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि डाटा सायन्सच्या माध्यमातून समाजासाठी कंपनी काय योगदान देऊ शकेल यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

ऋता दुर्गुळे म्हणाल्या, नवनाथ दरेकर यांनी एन एम डी इन्फोटेक सर्व्हिसेस च्या माध्यमातून नवोदित तरुणांना उद्योजक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संधी देत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. नवनाथ दरेकर हे केवळ उद्योजक नाही तर कंपनीच्या माध्यमातून नवीन उद्योजक घडवून ते देशाच्या आर्थिक विकासामध्ये ही हातभार लावत आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राकेश म्हात्रे, सुनीता वळवे, महेश शिंदे , विक्रम कोळी, प्रसाद हळदे ,पियुष काटकर, यश सूर्यवंशी, अथर्व पवार ,यशिका गायकवाड, सेजल झगडे, प्रभाकर कोनुरवार ,ओंकार खोत यांना विविध पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले प्रतिभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch