Dailyhunt
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या करोत्तर नफ्यात ३४.६ टक्क्यांची वाढ; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,६०० कोटी रुपयांची कमाई

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या करोत्तर नफ्यात ३४.६ टक्क्यांची वाढ; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,६०० कोटी रुपयांची कमाई

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२६ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षाचे आर्थिक निकाल मंजूर केले आहेत.

या निकालांबाबत मत व्‍यक्त करत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री.

अनुप बागची म्हणाले, "आर्थिक वर्ष २०२६ हे आमच्यासाठी एक ऐतिहासिक वर्ष आहे, कारण आम्ही २० कोटींहून अधिक ग्राहकांना विश्वास आणि वचनबद्धतेने दिलेल्या २५ वर्षांच्या सेवेचा सोहळा साजरा करत आहोत. ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण जीवन विमा संरक्षणाचे मूल्य ४६.११ लाख कोटी रुपये इतके आहे, ज्‍यामधून गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेला दृढ विश्वास दिसून येतो.

आमच्या ग्राहकांच्या मूल्यांप्रती असलेली बांधिलकी आणि लवचिक कार्यपद्धतीमुळे, आम्ही या वर्षातील आव्हानात्मक जागतिक मॅक्रो वातावरणाचा यशस्वीपणे सामना केला. आमच्या कंपनीच्या करोत्तर नफ्यामध्‍ये (पीएटी) वार्षिक ३४.६ टक्क्यांची मजबूत वाढ होऊन तो १,६०० कोटी रुपये झाला आहे. न्यू बिझनेस व्हॅल्यूमध्ये (व्‍हीएनबी) वार्षिक १०.९ टक्क्यांची वाढ होऊन २,६२९ कोटी रुपये झाली आहे, तसेच नफा क्षमता २४.७ टक्‍के राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीची एम्बेडेड व्हॅल्यू वार्षिक १०.५ टक्क्यांनी वाढून ५२,९८९ कोटी रुपये झाली आहे.

सप्टेंबर २०२५ मधील अलीकडील ० टक्‍के जीएसटी सुधारणेमुळे विमा पॉलिसी अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत आणि आमच्या रिटेल प्रोटेक्शन विभागाने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत ५०.९ टक्क्यांची प्रबळ वार्षिक वाढ नोंदवली आहे. परिणामी, किरकोळ नवीन व्यवसाय विमा रक्‍कमेने आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत ४९.५ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आणि आर्थिक वर्ष २०२६ अखेर ४.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

उत्पादन रचनेतील नवोपक्रमावर भर दिल्याने आम्हाला ग्राहकांच्या विविध गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करणे शक्य झाले आहे. आम्ही अलीकडेच आयसीआयसीआय प्रु ग्लोबल वेल्थ मल्टिप्लायर लाँच केले आहे, जे गिफ्ट सिटी आराखड्यांतर्गत अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करणारे उत्पादन असून जागतिक स्तरावरील फंडांमध्ये गुंतवणूक आणि जीवन विमा संरक्षण प्रदान करते. यासोबतच आम्ही आयसीआयसीआय प्रु स्मार्ट किड ३६० ही मुलांसाठीची एक शाश्वत बचत योजना सुरू केली आहे, जी लवचिक पे-आउट्स, अचिव्हमेंट रिवॉर्ड्स आणि प्रीमियम वेव्हरच्या (विमा हप्ता माफी) माध्यमातून मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सुरक्षित करते; यामुळे ग्राहक त्यांच्या गैरहजेरीतही आपल्या मुलांची भविष्यातील उद्दिष्टे सुरक्षित करू शकतात.

आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आमचे क्लेम सेटलमेंट रेशो (विमा दावा निपटारा प्रमाण) ९९.३ टक्‍के राहिले असून, हे दावे निकाली काढण्यासाठी सरासरी १.१ दिवस लागला आहे. संकटकाळात आमच्या ग्राहकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे निदर्शन आहे. कार्यक्षमता सुधारण्यासाठी आम्ही इकॉनॉमीज ऑफ स्केल, तंत्रज्ञान आणि डिजिटल सोल्यूशन्सचा सातत्याने वापर करत आहोत, ज्यामुळे आमच्या सेव्हिंग कॉस्ट-टू-प्रीमियम गुणोत्तरात ४० बेसिस पॉइंट्सची (बीपीएस) घट झाली असून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ते १२.१ टक्‍के राहिले आहे.

गेल्या २५ वर्षांत आम्हाला अनेक पिढ्यांतील ग्राहकांना सेवा देण्याचे भाग्य लाभले आहे. आम्हाला मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आम्ही भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था उभारण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जी विचारपूर्वक बदल स्वीकारेल, चपळाईने कृती करेल आणि विम्याची व्याप्ती वाढवून अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करेल. विम्याच्या सुलभ उपलब्धतेचा विस्तार करून सर्व भागधारकांना दीर्घकालीन शाश्वत मूल्य प्रदान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:

किरकोळ संरक्षण एपीई आर्थिक वर्ष २०२५ मधील ५९८ कोटी रुपयांवरून वार्षिक ३२.३ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७९१ कोटी रुपये झाला. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत यात ५०.९ टक्क्यांची जोरदार वार्षिक वाढ दिसून आली, ज्यामध्ये सप्टेंबर २०२५ नंतर जीएसटीमध्ये झालेल्या कपातीचाही वाटा आहे.

३१ मार्च २०२५ रोजीच्या ३९.४३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनीच्या ग्राहकांनी घेतलेले एकूण सक्रिय विमा संरक्षण मूल्य १६.९ टक्क्यांनी वाढून ४६.११ लाख कोटी रुपये झाले आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत न्यू बिझनेस व्हॅल्यू (व्‍हीएनबी) ९६५ कोटी रुपये राहिली. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये व्हीएनबी वार्षिक १०.९ टक्क्यांनी वाढून २,६२९ कोटी रुपयांवर पोहोचली असून नफा क्षमता (मार्जिन) २४.७ टक्‍के राहिली आहे.

आर्थिक निकष:

टिप:

आकडेवारीची राउंडिंग ऑफ (पूर्णांकात रूपांतर) केल्यामुळे घटकांचे एकूण बेरीज जुळणार नाही.

१: उप-कर्जावरील व्याज वगळून कमिशनसह एकूण खर्च / एकूण प्रीमियम

व्याख्या, संक्षेप आणि स्पष्टीकरणात्मक टिपा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch