Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बाप्पाच्या आशीर्वादाने स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा श्रीगणेशा

बाप्पाच्या आशीर्वादाने स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचा श्रीगणेशा

स्टार प्रवाहवर लवकरच दाखल होणाऱ्या 'तुझ्याकडे तुला मागणे' या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या राकेश बापटचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेची नायिका कोण असणार याची उत्सुकता आणखी वाढली होती.

अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे "इरा"या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धाडसी, हुशार आणि स्वतंत्र विचारांची इरा तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेली इरा अत्यंत मायाळू, बोलायला लाघवी आणि माणसं जपणारी आहे. आपल्या बोलण्याने समोरच्याचा राग शांत करण्याची कला तिच्याकडे आहे. आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला आवडतं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ती अत्यंत हळवी आहे. प्रामाणिक माणसांसाठी त्याग करण्याची तिची नेहमीच तयारी असते. मात्र तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कुणी तिच्याकडून त्यागाची अपेक्षा केली, तर हीच शांत आणि प्रेमळ इरा अन्यायाविरोधात पेटून उठते.

या भूमिकेविषयी सांगताना सायली साळुंखे म्हणाली, 'इरा ही माझ्यासाठी खूप खास भूमिका आहे. स्टार प्रवाह सोबत खूप जुनं नातं आहे. पुन्हा या परिवारात येताना अतिशय आनंद होतोय. आनंदाची गोष्ट अशी की गणपती बाप्पाच्या आमगनाची धामधूम सुर असतानाच नव्या मालिकेची घोषणा होतेय. बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हवा. इराच्या भूमिकेला अनेक पदर आहेत. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही छान भूमिका साकारायला मिळावी अशी इच्छा होती. तुझ्याकडे तुला मागणेच्या निमित्ताने ही संधी चालून आली.तेव्हा नक्की पाहा नवी मालिका तुझ्याकडे तुला मागणे लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch