नवी दिल्ली : दिल्लीतील 10 जनपथवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने ममता सध्या सक्रीय असल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी सांगितले की, सोनिया गांधींनाही विरोधकांची एकजूट हवी आहे. काँग्रेसचा स्थानिक पक्षांवर विश्वास आहे आणि स्थानिक पक्षांनाही काँग्रेसवर विश्वास आहे असेही ममता म्हणाल्या.

