पुणे : गुरुवार दिनांक २१/१०/२०२१ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग , रॉ वॉटर पंपींग , वडगाव जलकेंद्र , तसेच लष्कर जलकेंद्र , एस.एन.डी.टी / वारजे जलकेंद्र , नवीन होळकर भामा आसखेड , चिखली रावेत पंपींग येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील संपूर्ण पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे .
तसेच शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे .
चतु : श्रृंगी / एस.एन.डी.टी / वारजे जलकेंद्र परीसर : - पाषाण , औंध , बोपोडी , खडकी , चतुःशृंगी परिसर , गोखले नगर , जनवाडी , रेंजहिल्स , बावधान , बाणेर , चांदणी चौक इ . परिसर किष्किंदा नगर , रामबाग कॉलनी , डावी उजवी भुसारी कॉलनी , धनंजय सोसायटी , एकलव्य कॉलेज परीसर , महात्मा सोसायटी , गुरू गणेशनगर , पुणे युनिर्व्हसिटी परीसर , वारजे हायवे परीसर , वारजे माळवाडी , रामनगर , अहिरेगाव , पॉप्लयुलर नगर , अतुल नगर , शाहु कॉलनी , वारजें जलशुध्दीकरणाचा परीसर , आँध बावधन , सुस , सुतारवाडी , भुगाव रोड परीसर इत्यादी . लष्कर जलकेंद्र भाग : - लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी , चंदन नगर , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळे नगर , सातववाडी इत्यादी . नवीन होळकर व चिखली पंपींग भाग : - विद्यानगर , टिंगरे नगर , कळस , धानोरी , लोहगाव , मुळा रोड इत्यादी . भामा आसखेड जलकेंद्र परिसर : - लोहगाव विमाननगर , वडगाव शेरी , कल्याणीनगर , विश्रांतवाडी , फुलेनगर , येरवडा इत्यादी

