Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिवाळ्यासाठी एअर इंडियाने कॅनडाच्या उड्डाणात केली वाढ, मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन विमानसेवा सुरू; तर दिल्ली-टोरंटो मार्गावर अगदी नवीन B787-9 विमानांची उड्डाणे

हिवाळ्यासाठी एअर इंडियाने कॅनडाच्या उड्डाणात केली वाढ, मुंबई-टोरंटो दरम्यान नवीन विमानसेवा सुरू; तर दिल्ली-टोरंटो मार्गावर अगदी नवीन B787-9 विमानांची उड्डाणे

गुरुग्राम : दिल्ली-टोरंटो मार्गावर एअर इंडियाने आपले अगदी नवीन B787-9 विमान आज सेवेत रुजू केले. यामुळे एअरलाइनची अद्ययावत केबिन सुविधा आणि प्रवासादरम्यानचा उत्कृष्ट अनुभव पहिल्यांदाच कॅनडापर्यंत पोहोचणार असून, प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे.

या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आधारित, एअर इंडियाने 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी कॅनडातील आपल्या सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

नवीन, हंगामीमुंबई-टोरोंटोसेवा, सुधारितअंतर्गतसजावटीसह

25 ऑक्टोबर 2026 ते 26 मार्च 2027 दरम्यान एअर इंडिया मुंबई आणि टोरोंटो दरम्यान आठवड्यातून तीन वेळा थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि कॅनडासाठी दर आठवड्याला जवळपास 2,000 जागांची भर पडेल. तसेच या दोन शहरांदरम्यान थेट विमानसेवा चालवणारी ही एकमेव विमान कंपनी ठरेल.

एअर इंडियाच्या बोईंग 777-300ईआर विमानाद्वारे ही सेवा चालवली जाईल, ज्याच्या केबिनच्या अंतर्गत सजावटीत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हसी स्लाइडिंग डोअर्ससह 8 आलिशान फर्स्ट क्लास स्वीट्स, बिझनेस क्लासमध्ये 40 फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये 280 जागांचा समावेश आहे.

मुंबई आणि टोरोंटो दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुधारित B777-300ER विमानात वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही लाभ मिळेल.

एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली येथील प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून, कॅनडाला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद, कोची, लुधियाना आणि वडोदरा यांसारख्या अनेक भारतीय शहरांशी सहजपणे जोडले जाणे शक्य होते.

जानेवारी2027पासूनटोरोंटोसाठी100% नवीनकिंवासुधारितउत्पादनांचावापर

या हिवाळ्यात एअर इंडियाच्या दिल्ली-टोरोंटो मार्गावरील 10 साप्ताहिक उड्डाणांपैकी, 7 साप्ताहिक सेवा नवीन बोईंग 787-9 विमानांद्वारे चालवल्या जातील, ज्यात एअरलाइनची नवीन केबिन प्रॉडक्ट्स असतील. उर्वरित 3 साप्ताहिक सेवा सुरुवातीला बोईंग 777-300ईआर विमानांद्वारे चालवल्या जातील आणि ताफ्यात अधिक विमाने आल्यावर जानेवारी 2027 पासून त्या नवीन बोईंग 787-9 विमानांमध्ये रूपांतरित होतील.

त्यामुळे, टोरोंटोला येणाऱ्या आणि जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांमध्ये पूर्णपणे नवीन किंवा लक्षणीयरित्या सुधारित केबिन इंटिरियर्स असतील, ज्यामुळे प्रवाशांना एकसारखा प्रीमियम अनुभव मिळेल.

दिल्ली आणि मुंबईहून टोरोंटोसाठी नवीन तसेच अद्ययावत विमाने तैनात केल्यामुळे, एअर इंडियाला या हिवाळ्यात टोरोंटो मार्गावरील प्रीमियम श्रेणीतील जागांची क्षमता 71 टक्क्यांनी वाढवणे शक्य झाले आहे; परिणामी प्रवाशांना फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

एअरइंडियाचेमुख्यकमर्शिअलअधिकारीनिपुणअगरवालम्हणाले: "कॅनडा ही एअर इंडियाच्या सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपैकी एक आहे. येथील लोकांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ संबंध प्रवासाची मोठी मागणी निर्माण करतात, विशेषतः सणांचे दिवस आणि सुट्ट्यांच्या काळात. या हिवाळ्यात सुरू होणारी आमची हंगामी मुंबई-टोरंटो सेवा प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध करून देईल; हा असा काळ आहे जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला भेटण्यासाठी प्रवास करत असतात. त्याच वेळी, उत्तर अमेरिकेच्या मार्गावर आम्ही आमची अत्याधुनिक विमाने आणि विमानातील अद्ययावत सुविधा टप्प्याटप्प्याने सादर करत आहोत. जगातील सर्वात स्पर्धात्मक अशा लाँग-हॉल अर्थात दीर्घ पल्ल्याच्या बाजारपेठांपैकी एका बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प यातून सिद्ध होतो. एकत्रितपणे, हे उपक्रम एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा कंपनी बनवण्यासोबतच भारताला जगाशी जोडणारे पसंतीचे माध्यम म्हणून प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल."

टोरोंटोलाजाणाऱ्याआणितिथूनयेणाऱ्याविमानांचेवेळापत्रक:

सर्ववेळास्थानिकवेळेनुसार. (+1) पुढच्यादिवसाचेआगमनदर्शवते.

एअर इंडिया संकेतस्थळ आणि मोबाइल ॲप, ग्राहक संपर्क केंद्र आणि जगभरातील ट्रॅव्हल एजंट्स अशा विविध माध्यमांतून विमानांची तिकिटे आरक्षित करता येतील.

2026-27 च्या हिवाळी हंगामात, एअर इंडिया भारत ते कॅनडा दरम्यान दर आठवड्याला एकूण 20 विमाने चालवणार आहे; यामध्ये दिल्ली ते टोरंटो (आठवड्याला 10), मुंबई ते टोरंटो (आठवड्याला 3) आणि दिल्ली ते व्हँकुव्हर (आठवड्याला 7) अशा उड्डाणांचा समावेश असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch