Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगाव विमानतळावर शरद पवारांचे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून स्वागत; वैचारिक एकजुटीचे दर्शन

जळगाव विमानतळावर शरद पवारांचे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून स्वागत; वैचारिक एकजुटीचे दर्शन

ळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जळगाव विमानतळावर वैचारिक एकजुटीचे संकेत देणारे चित्र पाहायला मिळाले.

शरद पवार गटासोबतच अजित पवार गटाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

यावेळी दोन्ही गटांच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवारांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, दोन्ही गटांच्या नेत्यांनी भविष्यातील एकजुटीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, दोन्ही गटांची विचारधारा पुरोगामी असून मूलभूत विचार एकच आहेत. सध्या तांत्रिकदृष्ट्या एक गट महाविकास आघाडीसोबत, तर दुसरा गट एनडीएसोबत असला तरी वैचारिक पातळीवर दोन्ही गटांमध्ये फारसा फरक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शरद पवारांचे स्वागत करताना त्यांचा उल्लेख 'देशाचे नेते' आणि 'कार्यकर्त्यांचा विठ्ठल' असा केला. महाराष्ट्रात चांगल्या घडामोडींची सुरुवात जळगावातूनच होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

विमानतळावर दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेला सलोखा लक्षवेधी ठरला. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch