Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची हिंदी परीक्षा रद्द

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची हिंदी परीक्षा रद्द

शिवसेना UBT आणि मनसेच्या विरोधानंतर सरकारचा निर्णय

मुंबई प्रतिनिधी

राज्य सरकारचे राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली हिंदी भाषेची परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

या परीक्षेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने तीव्र विरोध व्यक्त केला होता.

शासकीय राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिनांक 28 जून रोजी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी हिंदी भाषेची परीक्षा घेण्यात येणार होती. कालच राज्य सरकारच्या भाषा विभागाने या परीक्षेसाठी परिपत्रक जारी केले होते. मात्र, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने या परीक्षेला तीव्र विरोध केला.

शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा म्हणजे पडद्याआडून शासकीय कामकाजात हिंदीचा शिरकाव करण्याचा प्रयत्न असून तो भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यानुसार राबवला जात असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली होती. या परीक्षा घेण्याचा घाट सरकारने घातला तर परीक्षा केंद्रावर 28 तारखेला जो तमाशा होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. ही परीक्षा घेण्याचे नेमके प्रयोजन काय हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी ही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch