Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोनालिका ट्रॅक्टर्सने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ५३,६६१ ट्रॅक्टर विक्रीची केली नोंद

सोनालिका ट्रॅक्टर्सने पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ५३,६६१ ट्रॅक्टर विक्रीची केली नोंद

पुणे : भारतातील क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने विक्रमी कामगिरीसह आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीचा टप्पा पूर्ण केला असून केवळ ३ महिन्यांत ५० हजार ट्रॅक्टरची विक्री केली आहे.

याद्वारे कंपनीने पहिल्या तिमाहीत आजवरच्या सर्वाधिक ५३,६६१ ट्रॅक्टर विक्रीची नोंद केली आहे. कंपनीने एकूण २३.१ टक्के एवढी अचंबित करणारी वाढ साध्य केली असून उद्योगाच्या कामगिरीला (अंदाजे १८.३ टक्के) मागे टाकले आहे. एप्रिल-जून २६ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वाधिक वाटा मिळवत ती गौरवाने उभी आहे. या नव्या यशामुळे आपल्या नावीन्यपूर्ण ट्रॅक्टर तंत्रज्ञानासह 'जीतने का दम' देण्याच्या कंपनीच्या कायमस्वरूपी भावनेला, तसेच गेल्या ३ दशकांपासून ब्रँडची प्रेरक शक्ती म्हणून कायम असलेल्या अपवादात्मक ग्राहक समाधानाची पुष्टी झाली आहे.

सोनालिकाच्या सातत्यपूर्ण वाढीतून अधिकतम मूल्याने जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची सोनालिकाची कटिबद्धता अधोरेखित होते. नव्याने सुरू झालेल्या सोनालिका गोल्ड ट्रॅक्टर सीरिजला चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सर्वात मोठे ३ सिलिंडर ३,५३२ सीसी इंजिन आणि शेतकऱ्यांना नफा मिळावा, यासाठी डिझाईन केलेली इतर कामगिरीकेंद्रीत वैशिष्ट्ये आहेत. या वेगवान वाटचालीला शक्ती पुरविण्यासाठी सोनालिकाचा जगातील सर्वात मोठा एकात्मिक ट्रॅक्टर प्लांट आहे. त्याला जागतिक संशोधन आणि विकास क्षमता आणि प्रिसिजन इंजिनिअरिंगमधील सातत्यपूर्ण गुंतवणूकीचा आधार आहे. त्यातून एकत्रितपणे सोनालिकाला जगभरातील शेतकऱ्यांसाठी 'वन स्टॉप सोल्यूशन पार्टनर' म्हणून काम करण्याची शक्ती मिळते.

नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या कामगिरीविषयी इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, 'आर्थिक वर्ष २०२७च्या अवघ्या ३ महिन्यांत ५०,००० ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा पार केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या 'जीतने का दम'सह नवीन कामगिरीचे निकष निर्माण करण्यासाठी आम्ही पारंपारिक विचारसरणीच्या पद्धतींना सातत्याने आव्हान दिले आहे आणि आमच्या विश्वासार्ह आणि शक्तिशाली ट्रॅक्टरसह आम्ही शेतकऱ्यांचा विश्वास मजबूत केला आहे. भारतीय शेतीमध्ये जे शक्य आहे त्याचे मापदंड सतत उंचावणे आहेत आणि भारतीय अभियांत्रिकीला जागतिक स्तरावर पुढे नेणे, हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. आर्थिक वर्ष २०२७ ची दुसरी तिमाही सुरू होत असताना, शेतकऱ्यांच्या निरंतर वाढीसाठी कार्यक्षम आणि अखंडित कृषिकार्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तयार आहोत."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch