Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसचे योगदान महत्वपुर्ण'.. प्रा. डॉ. गणेश राऊत

'स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसचे योगदान महत्वपुर्ण'.. प्रा. डॉ. गणेश राऊत

पुणे : भारतीय संग्रामत महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संधटनेचे व नेत्यांचे मौलीक योगदान लाभले व बापूंचे नेतृत्व, जिद्द, मुत्सदेगीरी ही पणाला लागले होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातुन गांधीजींच्या नेतृत्वाची जागतीक पातळींवर ओळख निर्माण झाली.

जगातील सर्वात महान माणूस म्हणजे महात्मा गांधीजी, असे वर्णन 1921 मध्येच अमेरिकन धर्मोपदेशक डॉक्टर जॉन हेनेस होम्स यांनी केले होते. अशा शब्दात गांधीजींचे मोठेपण प्राध्यापक डॉ. गणेश राऊत यांनी काँग्रेस भवन येथे सांगितले.
बीव्हीजी इंडिया लिमिटेड, क्लब हेरिटेज आणि एच. व्हि.देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हेरिटेज वॉक मध्ये ते बोलत होते. राजीव गांधी स्मारक समिती सह संयोजक होते.
महात्मा गांधीजींना पुणे नगरपालिकेने मानपत्र दिले त्याला 89 वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्ताने या 'हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य पुर्व काळातील काँग्रेस व स्वातंत्र्य लढा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते..!

याप्रसंगी डॉक्टर राऊत यांनी काँग्रेसचा इतिहास सांगितला.1 885 ते 1947 या कालखंडातील काँग्रेसच्या इतिहासातील प्रमुख घटनांचा त्यांनी आढावा घेतला.1 857 च्या अगोदर खानदेश, बीड, नांदेड, सातारा, सावंतवाडी, कोल्हापूर आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या कार्याचे मोठेपण राऊत यांनी सांगितले. भारतीयांचा पराभव हत्यारांच्या आधारे इंग्रजांनी केल्यामुळे गांधीजींनी त्यांना अहिंसेच्या माध्यमातून उत्तर दिले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ,दादाभाई नवरोजी ,महात्मा फुले यांच्या कार्याचे मोठेपण सांगून प्राध्यापक गणेश राऊत यांनी मीठ सत्याग्रह, 1936 चे पहिले ग्रामीण भागातील फैजपूर अधिवेशन, 1942 चे मुंबई अधिवेशन यांचा धावता आढावा घेतला .
राजीव गांधी समितीचे अध्यक्ष व काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी काँग्रेस भवन उभारणीचा ईतिहास व संस्मरणीय आठवणी सांगितल्या. हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या हौतात्म्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अघ्यक्ष व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनंतराव गाडगीळ यांनी अमेरिकेतील ,युरोपातील हेरिटेज जपणुकीची माहिती दिली. या कार्यक्रमास बीव्हीजी चे रवी घाटे, पुणे गुजराती केळवणी मंडळाचे सचिव दिलीप जगड , अभय छाजेड ,हुतात्मा दाभाडे यांचे वंशज आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने उपस्थित मान्यवरांचा नंदुशेठ पापळ, भोला वांजळे, सुरेश पापखी, धनंजय भिलारे, ॲड श्रीकांत पाटील, ॲड आश्वीनी गवारे इ नी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय वाघमारे यांनी केले. भाविका राका यांनी आभार मानले..

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch