Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तनिष्क नॅचरल डायमंड्स आणि राहुल मिश्रा एकत्र येऊन पॅरिस कूटुर वीक २०२६ मध्ये त्यांचे अनोखे आणि एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी कलेक्शन लाँच करणार

तनिष्क नॅचरल डायमंड्स आणि राहुल मिश्रा एकत्र येऊन पॅरिस कूटुर वीक २०२६ मध्ये त्यांचे अनोखे आणि एक्सक्लुझिव्ह ज्वेलरी कलेक्शन लाँच करणार

पॅरिस : तनिष्क नॅचरल डायमंड्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कूटुरियर राहुल मिश्रा यांनी पॅरिस कूटुर वीक २०२६ मध्ये एक्सक्लुझिव्ह कूटुर ज्वेलरी कलेक्शन सादर केले आहे. हे अशाप्रकारचे पहिलेच कलेक्शन आहे.

भारतातील सर्वात मोठे ज्वेलरी हाऊस आणि देशातील एक अतिशय सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर यांच्यातील एका ऐतिहासिक भागीदारीची ही शानदार सुरुवात आहे. हे कलेक्शन ओट कूटुर आणि हाय ज्वेलरीला एकत्र आणून आधुनिक भारतीय लग्झरीचे एक अनोखे रूप सादर करते. यामध्ये कूटुरच्या एका अद्भुत प्रवासाला अत्यंत सुंदर आणि अद्वितीय ज्वेलरी डिझाइन्सचे रूप देण्यात आले आहे.

गेले कैक महिने एकत्र मिळून केलेल्या सर्जनशील कामातून साकार झाले आहेत असे दागिने ज्यामध्ये राहुल मिश्रा यांची प्रसिद्ध कूटुर शैली आणि तनिष्क नैसर्गिक हिऱ्यांच्या कला आणि कारीगरीला शिल्पकलेसारख्या भव्य रूपात सादर करण्यात आले आहे. केवळ कूटुरशी जुळणारे दागिने बनवण्याऐवजी, दोन्ही ब्रँड्सनी प्रत्येक दागिना कपड्यांचाच एक भाग म्हणून डिझाइन केला आहे-जिथे दागिन्यांमध्येही तीच शिल्पकलेची अचूकता, हालचाल आणि कथा सांगण्याची शैली स्पष्टपणे दिसून येते.

रचना आणि निसर्गाच्या परस्पर ताळमेळातून प्रेरणा घेत, या कलेक्शनने शिल्पकलेसारखे भव्य आकार, बारीक डिटेलिंग आणि जेम्सटोन्सच्या अद्भुत कलाकुसरीद्वारे शिल्पकलेच्या रूपांना नैसर्गिक प्रवाही फुलांच्या डिझाइन्समध्ये बदलले आहे. आपल्या धाटणीचे अनोखे कूटुर ज्वेलरी क्रिएशन म्हणून तयार केलेले हे कलेक्शन, तनिष्कच्या नैसर्गिक हिऱ्यांची कारीगरी आणि राहुल मिश्रा यांच्या प्रसिद्ध डिझाइन शैलीला एका नव्या रूपात सादर करते. यामध्ये प्रत्येक दागिना कूटुरचाच एक भाग असल्यासारखा भासतो. या कलेक्शनच्या केंद्रस्थानी 'द एन्चांटेड कॅनोपी' आणि 'द इम्पेरियल कॅस्केड' नेकवेयर आहेत. यातील प्रत्येक दागिना निसर्ग, शिल्पकला आणि हालचाली यांना स्कल्पचुरल ज्वेलरीमध्ये साकारण्याची या कलेक्शनची संकल्पना उत्तम प्रकारे दर्शवतो. यात नॅचरल व्हाईट आणि ब्लॅक डायमंड्सना सिट्रीन, एमरल्ड, अ‍ॅमेथिस्ट, पिंक टूरमलाईन, रुबेलाईट आणि गार्नेट यांसारख्या मौल्यवान रत्नांची जोड देण्यात आली आहे. तसेच बारीक पावे, स्नो पावे, चॅनेल आणि प्रॉन्ग सेटिंग्सनी प्रत्येक क्रिएशनमध्ये एक देखणा प्रकाश, सखोलता आणि हालचालीची अनुभूती दिली आहे. आपल्या प्रकारचे एकमेव आणि लिमिटेड-एडिशन कूटुर क्रिएशन्स म्हणून डिझाइन केलेले हे दागिने संग्रही ठेवण्यायोग्य कलाकृतीसारखे, पॅरिस कूटुर वीकमध्ये खास सादरीकरणासाठी तयार केले गेले आहेत. यानंतर, ते फक्त निवडक शोकेस आणि प्रायव्हेट क्लायंट एक्सपिरियन्सद्वारेच उपलब्ध होतील. लक्झरीची सर्वोच्च व्याख्या स्पष्ट करणारे हे कलेक्शन, दुर्मिळतेचे, अजोड कारीगरीचे आणि कस्टमाइज्ड शैलीचे प्रतीक आहे.

फॅशनच्या एका सर्वात प्रतिष्ठित जागतिक मंचावर पदार्पण करत, हे कलेक्शन नैसर्गिक हिऱ्यांच्या कारीगरीमधील तनिष्कचा अनेक दशकांचा अनुभव आणि राहुल मिश्रा यांचा कूटुरद्वारे कथा सांगण्याचा दृष्टिकोन यांची सांगड घालते. हे आधुनिक भारतीय लग्झरीचे एक असे व्हिजन सादर करते, जे आपल्या मुळांशी आणि वारशाशी घट्ट जोडलेले असण्यासोबतच जगभरातील लग्झरी पारखी ग्राहकांच्या मनालाही स्पर्श करते.

ही भागीदारी आणि डिझाइन्सबद्दल बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर, रेवती कांत म्हणाल्या, "कूटुर हे नेहमीच उत्कृष्ट कलेचे सर्वोच्च रूप राहिले आहे आणि दागिन्यांमध्ये कथा, भावना व विलक्षण कला सामावून घेण्याची एक अनोखी क्षमता असते. पॅरिस कूटुर वीकमध्ये हे कलेक्शन सादर करणे हा एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक टप्पा आहे-केवळ राहुल मिश्रा यांच्यासोबतच्या या भागीदारीसाठीच नव्हे, तर स्वतः भारतीय डिझाइन विश्वासाठीही! भारतातील दोन दिग्गज क्रिएटिव्ह हाउसेस एकत्र येऊन हे सिद्ध करत आहेत की, आपली कारीगरी, नावीन्य आणि अद्भुत डिझाईन जगभरातील कूटुर ज्वेलरीच्या विचारसरणीला आणि प्रवाहाला एक नवा आकार देऊ शकतात. केवळ एका कलेक्शनपेक्षा बरेच पुढे जात, हा आपल्या क्रिएटिव्हिटीचा, वारशाचा आणि आधुनिक लग्झरीचा सन्मान आहे. हे कलेक्शन एक अशी प्रगत डिझाईन शैली दर्शवते, जी परंपरेचा आदर तर करतेच, सोबतच जागतिक मंचावर भारतीय ज्वेलरीच्या कक्षा अधिक रुंदावते."

या भागीदारीबद्दल बोलताना राहुल मिश्रा म्हणाले, "एक कूटुरियर या नात्याने, भारतीय कारीगरीच्या विलक्षण क्षमता जगासमोर आणणे हाच माझा नेहमीचा दृष्टिकोन राहिला आहे. ही भागीदारी त्याच विचाराला ज्वेलरीच्या रूपात एका नव्या विस्तारासह सादर करते. सहसा मी माझी प्रेरणा माझ्या कशिदाकारीमधून व्यक्त करतो पण यामध्ये माझ्या प्रेरणेला नैसर्गिक हिरे आणि मौल्यवान जेम्सटोन्सची अदभूत जोड मिळाली आहे. तनिष्क नॅचरल डायमंड्ससोबत एकत्र येत, आम्ही असे दागिने तयार केले आहेत, जे मॉडर्न हाय ज्वेलरीची भाषा बोलतात आणि त्याच वेळी भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाशी घट्ट जोडलेले आहेत. ज्वेलरी मेकिंगमधील त्यांच्या अजोड कौशल्यामुळेच कूटुरमधील हालचाली, तिचा पोत आणि भावनांना या डिझाइन्समध्ये साकारणे शक्य झाले. यामुळेच या क्रिएशन्स बारकावे आणि प्रवाही अंदाजासह कथांचा एक गडद प्रवास उलगडतात. 'द मेटामॉर्फोसिस' नेकवेयर बदलाचे सौंदर्य आणि निरंतर विकास दर्शवतो, तर 'द फ्लोरल हेक्सागोन' नेकवियर भौमितिक रचना आणि निसर्गामधील सुंदर ताळमेळ शोधतो. हे दागिने केवळ स्वतंत्र क्रिएशन्स नाहीत, तर ते अशा एका कल्पनेचा उत्सव साजरा करतात जिने माझ्या कामाला नेहमीच दिशा दिली आहे: मी असे मानतो की, कला स्वतःमध्ये आठवणी साठवून ठेवते, आणि जेव्हा तिला पूर्ण निष्ठेने एक नवे रूप दिले जाते, तेव्हा परंपरा एका नव्या आणि अत्यंत अर्थपूर्ण मार्गाने पुढे जात राहते."

हे कलेक्शन कूटुर आणि दागिन्यांमधील एक अनोखा ताळमेळ दर्शवते. इथे डिझाईन, मौल्यवान जेम्सटोन्स आणि कला यांच्या मिलापातून अशा कलाकृती तयार झाल्या आहेत, ज्या केवळ फॅशनपुरत्या मर्यादित राहत नाहीत. प्रत्येक क्रिएशन रॅम्पची जादू स्वतःमध्ये सामावून घेते. यासोबतच, हे उत्कृष्ट सर्जनशील दृष्टिकोन आणि सदैव अजरामर राहणाऱ्या डिझाईनचे एक अद्भुत रूप बनते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch