Wednesday, 28 Jul, 10.19 pm महाराष्ट्र लोकमंच

होम
तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल: देवेंद्र फडणवीस

सातारा : हे मोठे नुकसान असून सर्वांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्याने घरे बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणे अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल. आणि सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी सांगितले. पूर पाहणी दौऱ्यानंतर ते माध्यमासोबत बोलत होते.

निर्सगाचा फटका सातारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणांत बसला आहे. हजारो संसार उध्दवस्त झाले आहेत. हजोरा कुटुंबिय बेघर झाले आहेत. पुरग्रस्तांनी आपल्या कुटुंबातील आप्त गमाविले आहेत. पुरग्रस्तांचे सांत्वन करुन त्यांना या निर्सगाच्या संकटातून बाहेर काढून त्यांना धीर देण्यासाठी आज विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सातारा येथे भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना जीवनाश्यक वस्तूंची तातडीने मदत मिळवून दिली. निसर्गाच्या सकंटामुळे स्थलांतरीत झालेल्यांच्या वेदना समजावून घेतल्या. सरकार दरबारी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्दही विरोधी पक्ष नेत्यांनी यावेळी दिला.

सातारा जिल्हयातील आंबेघर येथील दुर्घटनेनंतर तेथील पूरग्रस्तांना मोरगिरी गावातील कोयना शिक्षण संस्था शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी बुधवारी साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली. हुंबराळी गावाची पाहणी केली. तसेच कोयनानगर येथील स्थंलातरीत कुटुंबांची भेट घेतली. तसेच मोरणा विद्यालय, मोरगिरी, आणि न्यू इंग्लिश स्कूल, धावडे, तालुका पाटण येथेही भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली.

अनेकांच्या घर व शेतीचे नुकसान झाले असून, याठिकाणी तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावेळी मदत साहित्याचे वितरण करून तात्पुरत्या स्वरूपातील दिलासा देण्याचा प्रयत्न केला. स्थालांतरीत नागरिकांना धीर देण्याचे काम करत जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येते, त्यातीलच जेवण विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद प्रविण दरेकर स्वत:ही जेवले.

सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. लोकांचे संसार पाण्यात बुडाले, अनेक लोकांचे बळी गेले, त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी तसेच त्यांची विचारपूस करण्याकरता दोन्ही विरोधी पक्षनेते सातारा जिल्ह्यात गेले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch
Top