Dailyhunt
'वी मुव्हीज अँड टीव्ही' चे मायक्रो-ड्रामा क्षेत्रात पदार्पण; 'बुलेट मायक्रोड्रामा' ॲप युजर्ससाठी निशुल्क उपलब्ध

'वी मुव्हीज अँड टीव्ही' चे मायक्रो-ड्रामा क्षेत्रात पदार्पण; 'बुलेट मायक्रोड्रामा' ॲप युजर्ससाठी निशुल्क उपलब्ध

देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी वी चा कन्टेन्ट ॲग्रीगेटर प्लॅटफॉर्म 'वी मुव्हीज अँड टीव्ही' ने मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या छोट्या आणि भागांमध्ये विभागलेल्या कन्टेन्टची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, ' मायक्रो-ड्रामा ' श्रेणीत पदार्पण केल्याची घोषणा केली आहे.

'बुलेट मायक्रो-ड्रामा' ॲपसोबत हातमिळवणी करून 'वी मुव्हीज अँड टीव्ही'मार्फत पहिल्यांदाच मायक्रो-ड्रामा पाहता येतील.

भारतीय प्रेक्षकांमध्ये, विशेषतः स्मार्टफोनचा प्रामुख्याने वापर करणाऱ्या वर्गामध्ये 'मायक्रो-ड्रामा' वेगाने लोकप्रिय होत आहेत. उद्योगक्षेत्राच्या अहवालांनुसार, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत जगभरातील मायक्रो-ड्रामा प्लॅटफॉर्म्सच्या एकूण डाऊनलोड्सपैकी ११% वाटा भारताचा होता, जो ३.५ कोटींच्या घरात पोहोचला आहे. भारतातील मायक्रो-ड्रामा बाजारपेठ मोठी झेप घेण्यास सज्ज असून, ती २०२६ पर्यंत १.५ अब्ज डॉलर्स आणि २०३० पर्यंत ४.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. ही वाढ प्रामुख्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील वाढती लोकप्रियता, तरुण प्रेक्षक आणि बदलत्या मनोरंजन सवयींमुळे होणार आहे. साधारणपणे ४० ते ९० मिनिटांचा दररोजचा 'वॉच टाइम' आणि ९० टक्क्यांहून अधिक 'कम्प्लिशन रेट' (पूर्ण मालिका पाहण्याचे प्रमाण) यामुळे या श्रेणीमध्ये प्रेक्षकांची जबरदस्त ओढ दिसून येते.

निशुल्क उपलब्ध असलेल्या कन्टेन्टचा पोर्टफोलिओ सातत्याने वाढवण्यावर वी भर देत असल्याचे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यामुळे आता 'वी मुव्हीज अँड टीव्ही' चे ग्राहक एकाच प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टार, सोनीलिव, झी5, ऍमेझॉन एमएक्स प्लेयर आणि अशा २० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मोफत आणि सशुल्क कन्टेन्टचा आनंद घेऊ शकतील. यासोबतच, अनेक सबस्क्रिप्शन्स सांभाळण्याची कसरत न करता ४०० हून अधिक लाईव्ह टीव्ही वाहिन्या देखील एकाच ठिकाणी उपलब्ध होतील.

'वी मुव्हीज अँड टीव्ही' वरील मायक्रो-ड्रामाच्या सूचीमध्ये रोमान्स, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यांसारख्या विविध शैलींमधील आणि बहुभाषिक टायटल्सचा समावेश असेल. यामध्ये रिक्षा रोमिओ (हिंदी आणि इंग्रजी), ऑटोराजा (तेलगू, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी), लेडी बॉस (तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी), कॉमेडी कपल (हिंदी) आणि स्वीट १६ (बंगाली) यांसारख्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यामुळे प्रादेशिक आणि भाषिक आवडीनिवडी देखील जपल्या जातील.

कंटेंट ॲग्रीगेटर म्हणून वी चे स्थान या लॉन्चने स्थान अधिक मजबूत केले आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, कंपनी एकाच प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचे विविध प्रकार उपलब्ध करून देत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch