Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशनतर्फे फ्रेनी झाल तारापोर यांना जीवनगौरव पुरस्कार

युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशनतर्फे फ्रेनी झाल तारापोर यांना जीवनगौरव पुरस्कार

यूडब्ल्यूए सभागृहाला डॉ. प्रभा देवधर यांचे नाव

पुणे : युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन (यूडब्ल्यूए), पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, एसएनडीटी होम सायन्स महाविद्यालय, पुणेच्या संस्थापक प्राचार्या आणि यूडब्ल्यूएच्या माजी विश्वस्त फ्रेनी झाल तारापोर यांना 'जीवनगौरव पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या प्रभावी कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास प्रेमचंद बाफना, डॉ. सुचित्रा रॉय, फ्रेनी झाल तारापोर आणि मालती कलमाडी उपस्थित होत्या.

यावेळी यूडब्ल्यूएच्या माजी अध्यक्षा डॉ. प्रभा देवधर यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या सभागृहाचे नामकरण 'डॉ. प्रभा देवधर स्मृती सभागृह' असे करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यूडब्ल्यूएच्या कार्यात त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान, विशेषतः वर्किंग वूमेन्स हॉस्टेल उभारण्यात बजावलेली भूमिका आणि संस्थेचा पाया भक्कम करण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

या कार्यक्रमास फ्रेनी झाल तारापोर आणि डॉ. प्रभा देवधर यांच्या कुटुंबीयांसह बायफचे माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, एसएनडीटी महाविद्यालयाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीबाला काकतकर यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch