Wednesday, 02 Oct, 10.49 am महाराष्ट्र न्यूज

होम
IND vs SA : रोहितच्या शतकी खेळीने सलामीची डोकेदुखी संपली, पावसामुळे खेळात व्यत्यय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने चहापानापर्यंत १७४ चेंडूत नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. पहिल्या सत्रानंतर भारतीय सलामीवीरांनी सामन्यावरची आपली पकड अधिक घट्ट केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढण सुरुच ठेवलं. चहापानापर्यंत भारताने एकही गडी न गमावता २०२ धावांपर्यंत मजल मारली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए मैदानावरील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर रोहित शर्माला यंदा कसोटी संघात स्थान देण्यात आले असून फलंदाजीसाठी रोहित शर्मा-मयांक अगरवाल या जोडीने मैदानात पाऊल ठेवताच एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला आहे.

तब्बल ४७ वर्षांनंतर दोन नवीन सलामीवीरांनी भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात केली आहे. ४७ वर्षांपूर्वी सुनील गावसकर आणि रामनाथ पारकर या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात करून दिली होती. भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुलला त्याच्या खराब कामगिरीमुळे आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. मयांकने आतापर्यंत भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत, ते चारही सामने भारताबाहेर खेळले आहेत. भारतीय मैदानावर मयांकचा हा पहिलाच सामना असणार आहे.

भारत 202/0 (59.1)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra News
Top