Dailyhunt
30000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा दाखवला रस्ता; नंतर नवीन सीएफओला 9 कोटींचे पॅकेज; Oracle चा अचंबित करणारा कारनामा

30000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा दाखवला रस्ता; नंतर नवीन सीएफओला 9 कोटींचे पॅकेज; Oracle चा अचंबित करणारा कारनामा

Oracle News Today: भारतात सुमारे 12000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणाऱ्या ओरॅकलने अनेकांना अचंबित करणारा निर्णय घेतला आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Oracle सध्या दोन प्रमुख कारणांमुळे चर्चेत आहे.

एकीकडे कंपनीने जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी केली आणि दुसरीकडे, कंपनी मोठ्या कर्ज आणि रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करत असताना AI च्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी एका नवीन CFO ची नियुक्ती केली आहे.

सकाळी 6 वाजता ई-मेल अन् हजारोंनी नोकरी गमावली

आयटी क्षेत्रात सध्या नोकर कपातीची टांगती तलवार लटकली असून 31 मार्च रोजी सकाळी 6 वाजता जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना एक ईमेल मिळाला ज्यात त्यांनामंगळवार (31 मार्च) कंपनीतील त्यांचा शेवटचा दिवस असल्याचे कळवले गेले. 'ओरॅकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर एका व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून आम्ही कंपनीतील तुमचं काम इथंच थांबवत आहो,' असे ई-मेलमध्ये नमूद केलेले.

त्यातच ही कर्मचारी कपातीचा केवळ पहिला टप्पा असून ओरॅकल येत्या काळात एकूण 30000 नोकऱ्या कमी करण्याची शक्यता अहवालानुसार वर्तवली जात आहे.

ओरॅकलच्या नवीन सीएफओ हिलरी मॅक्सन कोण?

ओरॅकलने हिलरी मॅक्सन यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती करून कर्मचारी कपातीच्या आठवड्याची सुरुवात केली. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. मॅक्सन यांनी यापूर्वी श्नाइडर इलेक्ट्रिकमध्ये ग्रुप सीएफओ म्हणून काम केले आहे, ज्या कंपनीचा वार्षिक महसूल 45 अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे 4.19 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे.

हिलरी यांना पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात व्यापक अनुभव असून कंपनी मॅक्सन यांना 950,000 डॉलर्स, अंदाजे 8.83 कोटी रुपये वार्षिक मूळ पगार देणार असल्याचे नियामक दाखलपत्रांतून समोर आले आहे. याव्यतिरिक्त हिलरी कामगिरीवर आधारित 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 20 कोटी रुपये बोनससाठी पात्र ठरतील.

ओरॅकलमध्ये नोकर कपातीचे कारण काय
ओरॅकल एआय डेटा सेंटरच्या विस्तारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचा ब्लूमबर्गने आपल्या अहवालात दावा केलेला. OpenAI सारख्या कंपन्यांचा एआय वर्कलोड हाताळण्यासाठी ओरॅकल ऐतिहासिक पातळीवर डेटा सेंटर्सची उभारणी करत आहे, पण ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याच्या शर्यतीत कंपनीवरील कर्जाचे ओझंही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

अशा परिस्थितीत, सध्याच्या आर्थिक तुटवड्यावर मात करण्यासाठी कंपनीकडे कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबत आहे. सर्वाधिक कर्मचारी कपात अशा नोकरीच्या श्रेणींमध्ये होत आहे, जी आता एआय वापरून केली जाऊ शकतात असेही अहवालात पुढे म्हटले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims