Dailyhunt
50000 कोटींचं मार्केट कॅप, 1000 रुपयांचा शेअर आता 2 रुपयासाठी तरसतोय; एका चुकीने कंपनीचं पानिपत

50000 कोटींचं मार्केट कॅप, 1000 रुपयांचा शेअर आता 2 रुपयासाठी तरसतोय; एका चुकीने कंपनीचं पानिपत

Penny Stock: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 'जॅकपॉट' स्टॉक हवा असतो. शेअर मार्केटमध्ये असे काही शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना अनेक पटीने जास्त परतावा दिला आहे तर काही स्टॉक्स असेही आहेत ज्यांच्यामुळे गुंतवणूकदारांवर अक्षरशः रडायची वेळ आली आहे.

एकेकाळी रिअल इस्टेट क्षेत्रातील झगमगत्या कंपन्यांपैकी असणाऱ्या HDIL कंपनीचा शेअरही अशाच स्टॉक्सपैकी आहे.

HDIL एकेकाळी रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी आणि प्रभावशाली कंपनी मानली जायची पण उंच शिखरावून ही कंपनी इतक्या वेगाने कशी कोसळली? हाच प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

कधीकाळी 1000 रुपयांच्या शेअरची आज बिकट अवस्था

जानेवारी 2008 मध्ये Housing Development and Infrastructure Ltd या कंपनीचे बाजार मूल्य 50 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते, पण 91.96 कोटी - 96 कोटी रुपया इतके राहिले आहे. एवढंच नाही तर या कंपनीच्या शेअरची किंमतही एक हजार रुपयांवर पोहोचलेली पण आता स्थिती अशी आहे की हा स्टॉक दोन रुपयासाठीही चाचपटत आहे.

99% कोसळली शेअरची किंमत
दीर्घकाळात या रिअल इस्टेट शेअरची किंमत 99% पेक्षा जास्त घसरली आहे. 11 जानेवारी 2008 रोजी HDIL शेअरचा भाव 1000 रुपयांपेक्षा जास्त होता.तेव्हापासून त्यात 100% पेक्षा जास्त पडझड झाली असून यामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. पण अद्यापही या स्टॉकच्या गुंतवणूकदारांचे नुकसान भरून निघू शकलेले नाही.

HDIL कंपनीचा व्यवसाय काय
रिअल इस्टेट डेव्हलपमेंटवर आधारित HDIL चा व्यवसाय मॉडेल प्रामुख्याने होता. कंपनीने निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसोबतच झोपडपट्टी पुनर्वसन व इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्येही कार्यरत होती. तसेच मुंबई आणि पुणे परिसरात लक्झरी हाऊसिंग आणि TDR जनरेशनवर कंपनीचा विशेष भर होता.

जानेवारी 2008 पर्यंत कंपनीचा सुवर्णकाळ चालला आणि त्यावेळी कंपनीचे बाजार मूल्य 50 हजार कोटींपर्यंत तर, शेअरने 1,113.74 रुपयांच्या उच्चांकावर उसळली घेतलेली. पण इथूनच खेळ बिघडला आणि आता याच कंपनीचे बाजार मूल्य 100 कोटी रुपयांपेक्षाही कमी राहिले आहे.

HDIL चे पतन कसे सुरू झाले
प्रचंड कर्जाचं ओझं आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे HDIL कंपनी बुडू लागली. कंपनीवर एकूण 8,138 कोटींच्या कर्जाचा भार पडला ज्यापैकी 6,835 कोटी रुपये secured liabilities, 920 कोटी रुपये unsecured liabilities आणि घर खरेदीदारांचे सुमारे 620 कोटी रुपये थकलेले.

त्याचवेळी, कंपनीवर गैरव्यवस्थापन आणि निधी वळवण्याचे आरोपही केले गेले असून PMC बँक घोटाळ्यात 4,355 कोटींच्या एक्स्पोजरने परिस्थिती आणखी बिघडली. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला असताना 2008 च्या मंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात आलेली मंदी आणि over-leverage मुळे कंपनी पुन्हा उभी राहू शकली नाही.

2011 पासूनच कंपनीचे कर्ज NPA झाले ज्यामुळे आर्थिक ताण वाढला. 2019 मध्ये बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवरून NCLT कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू केली आणि सध्या कंपनीची liquidation प्रक्रिया सुरू आहे. HDIL कंपनीच्या प्रकल्पांमध्ये आज तब्बल सहा हजार घर खरेदीदार अडकले असून अनेक प्रकल्पांचा तोडगा निघालेला नाही आणि liquidation प्रक्रियेला 'तारीख पे तारीख' मिळत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims