Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८ वर्ष UPSC दिवसाचा १८ तास अभ्यास पण मेहनत गेली वाया, अपयश आल्यावर लोक कसे वागतात, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

८ वर्ष UPSC दिवसाचा १८ तास अभ्यास पण मेहनत गेली वाया, अपयश आल्यावर लोक कसे वागतात, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

८ वर्षं UPSC आणि ५ वेळा राज्यसेवा परीक्षेची तयारी करूनही यश न मिळालेल्या एका तरुणीनं आपलं मनोगत एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. अन् हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नागरी सेवा परीक्षा अर्थात UPSC परीक्षा होऊन IAS, IPS, IFS किंवा IRS सारखी सरकारी नोकरी मिळवायची, ही अनेकांची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी जवळपास १३ ते १५ लाख विद्यार्थी UPSC परीक्षा देतात. पण त्यापैकी फार फार तर काहीच विद्यार्थी पुढच्या टप्प्यांपर्यंत पोहोचतात. उर्वरित मंडळी पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू करतात. यावरून UPSC परीक्षा पास होणं किती कठीण असतं, हे लक्षात येतं.

याच पार्श्वभूमीवर UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या एका तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे. UPSC पास झाल्यानंतर सगळीकडे उदोउदो होतो. ज्यांनी कधी फोनही केला नाही, ते नातेवाईक घरी येऊन कौतुक करतात. पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं काय? वर्षानुवर्षे दिवस-रात्र मेहनत करूनही जेव्हा अपयश हाती येतं, तेव्हा मानसिक स्थिती काय असते? हा अनुभव या व्हिडीओमधील तरुणीनं सांगितला आहे. तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, कदाचित तुम्हालाही अपयश पचवण्याची ताकद या व्हिडीओमधून मिळू शकते.नेमकं काय म्हणाली?​



या तरुणीचं नाव हरमिंदर कौर आहे. तिनं livelikehk या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर करत UPSC परीक्षेचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणते, "८ वर्षं UPSC परीक्षेची तयारी केली. ५ वेळा राज्यसेवा परीक्षेची तयारी केली. पण शेवटी अपयशच हाती आलं. दिवसाचे १४ तास अभ्यास केला. मित्र-मंडळींपासून दूर राहिले. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली. प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही यश मिळालं नाही."

ती पुढे सांगते, "आता ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा आयुष्यात नवी सुरुवात करत आहे. गुरुग्राममध्ये १८ हजार रुपयांची नोकरी मिळाली आहे. UPSC च्या तयारीतून मिळालेला अनुभव आयुष्यात कायम उपयोगी पडतो. त्यामुळे हार न मानता पुन्हा एकदा पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे."
UPSC सर्व परीक्षांची आई?​



हा व्हिडीओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या तरुणीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी स्वतःचे अनुभवही शेअर केले.

खरंच, UPSC परीक्षा पास होणं अत्यंत कठीण काम मानलं जातं. ही परीक्षा विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक आणि भावनिक कसोटी पाहते. तासन्तास अभ्यास करूनही वर्षानुवर्षे यश मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे ही परीक्षा संयम, धैर्य आणि चिकाटीचीही कसोटी पाहते. आयुष्यातील महत्त्वाची वर्षं या तयारीत जात असल्याने, अपयश आलं तर पुढे काय करायचं ही चिंता विद्यार्थ्यांना सतावत राहते. त्यामुळे भारतात UPSC परीक्षा अनेकदा "सर्व परीक्षांची आई" म्हणून ओळखली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims