Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'आम्ही घालवलेला प्रत्येक क्षण खूप चांगला, पण आमचे मार्ग वेगळे झाले' बॉबी देओलसोबतच्या नात्याबद्दल Pooja Bhatt चं वक्तव्य

'आम्ही घालवलेला प्रत्येक क्षण खूप चांगला, पण आमचे मार्ग वेगळे झाले' बॉबी देओलसोबतच्या नात्याबद्दल Pooja Bhatt चं वक्तव्य

मुंबई - बॉलिवूडमध्ये लव्हस्टोरी अनेकदा चित्रपटाच्या सेटवर सुरू होतात आणि पडद्यामागेही त्याबद्दल चर्चा होत राहते. मात्र, पूजा भट्ट आणि बॉबी देओल यांची लव्हस्टोरी थोडी वेगळी होती. पूजा भट्ट आणि बॉबी देओल रिलेशनशिपमध्ये होते.

पण विशेष म्हणजे, प्रेक्षकांना त्यांना चित्रपटात एकत्र पाहण्याची संधी कधीच मिळाली नाही. आता, अनेक वर्षांनंतर, पूजा भट्टने बॉबी देओलसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, त्याच्यासोबत घालवलेला वेळ तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक होता.

बॉबी देओलसोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाली पूजा भट्ट?

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा भट्टला बॉबी देओलबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा पूजा भट्ट म्हणाली की, ती बॉबीला खूप नंतर भेटली. तुमचं एकमेकांवर प्रेम होतं का? असं विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, 'हो, नक्कीच. एकमेकांवर प्रेम करण्यात काही गैर आहे का?'



त्यानंतर पूजा भट्टने बॉबी देओलसोबतच्या तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. पण ब्रेकअपचं कारण सांगण्यास नकार दिला. पूजानं सांगितलं की ती आणि बॉबी वेगवेगळ्या मार्गांनी जात होते. आम्ही घालवलेला प्रत्येक क्षण खूप चांगला होता, पण आमचे मार्ग वेगळे झाले होते. ब्रेकअपचं कारण न सांगता पूजा भट्ट म्हणाली, 'माझं त्याच्यासोबतचं नातं का संपलं यावर बसून चर्चा करणं मला योग्य वाटत नाही... हो, आमचा ब्रेकअप झाला. आम्ही ते कधीच नाकारलं नाही. आज तो विवाहित आहे, मोठ्या मुलांचा बाप आहे आणि त्याचं करिअरही उत्तम आहे. मला 'ॲनिमल' सिनेमातील त्याचा अभिनय खूप आवडला.'


'मी आमचं नातं क्षुल्लक मानणार नाही. आजच्या काळात केवळ स्वतःच्या आयुष्यासाठीच नव्हे, तर तुमच्या आयुष्यात आलेल्या आणि त्यांच्या आयुष्यात असलेल्या लोकांसाठीही जगणं खूप महत्वाचं असतं' असं पूजा भट्टने सांगितलं.

दरम्यान, बॉबी देओलनं १९९६ मध्ये तान्याशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं आहेत. दुसरीकडे, पूजा भट्टनं २००३ मध्ये मनीष मखिजाशी लग्न केलं, पण ११ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून पूजा सिंगल असून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims