Finance Horoscope 28 August 2026 In Marathi: शुक्रवारी रक्षाबंधन आहे. बहिण-भावाच्या अतूट नात्याचा हा सण, बहिणीच्या मनातील प्रेम आणि भावाच्या हृदयातील जिव्हाळा सदैव कायम राहो…शुभ रक्षाबंधन!
आज जरा- जिवंतिका पूजनासह हंस राजयोगाचा प्रभावही असेल. तेव्हा मेष, वृषभसह या राशींसाठी कामाचा वेग वाढेल तसेच ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण असेल. कर्क, कन्यासह या राशींसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. तुळ, वृश्चिकसह या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि वैयक्तिक बाबतीत संयमाने वागा आणि सावध राहा. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल सविस्तरपणे पाहूया.
Arthik Rashi Bhavishya 28 August 2026: शुक्रवारी रक्षाबंधन आहे. एक धागा, एक विश्वास, रक्षाबंधन प्रत्येक भावाबहिणीसाठी खास असे चित्र घराघरातून पाहायला मिळेल.सर्व बहिण-भावांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! रक्षाबंधनाच्या दिवशी गुरू उच्च स्थानी असून हंस राजयोग तयार होत आहे. तसेच आज जरा- जिवंतिका पूजन देखील आहे. तेव्हा मेषसाठी कामात उत्साह आणि वेग कर्कला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, वृश्चिकसाठी कामाचा ताण वाढेल, मकरसाठी प्रमोशन किंवा पगारवाढीची चर्चा होण्याची शक्यता, मीनसाठी अहंकारामुळे ताण वाढू शकतो. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी शुक्रवार कसा असेल, आर्थिक कुंडली काय सांगते, सविस्तरपणे जाणून घेऊया.मेष आर्थिक राशिभविष्य - सल्ला लाभदायक, कामाचा वेग उत्तम

मेष राशीसाठी शुक्रवार ठिक असून नोकरी असो किंवा व्यवसाय कामाच्या ठिकाणी आनंद आणि उत्साह असेल. तुम्ही खूप उत्साहाने काम करणार असून त्यात वेग असेल. प्रत्येक नवीन काम करताना त्याच्या कायदेशीर बाबी आधी नीट समजून घ्या, येथे तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक असेल. व्यवसायाच्या संदर्भातही जाणकारांचा सल्ला मोलाचा ठरेल, त्यामुळे कामाची रणनीती आखणे सोपे जाईल. घरात वातावरण ठिक असून मानसिक समाधान वाढेल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य - कामात यश, चिडचिड कमी करा

वृषभ राशीसाठी शुक्रवार सकारात्मक असून स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. दिवसभर व्यस्त राहणार आहात कारण दिवसाची सुरुवात व्यवसायाशी संबंधित अडचणी सोडवण्याने होणार आहे. घाबरू नका जिथे संकटं येतात तिथेच प्रगती लवकर होते. प्रयत्न सुरु ठेवा कामात नक्की यश मिळेल. मेहनत आणि चिकाटी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लव लाइफसाठी वेळ ठिक असून नाते मधुर होईल. घरातील वातावरण सकारात्मक असेल दरम्यान तुम्ही रागावर कंट्रोल करा, तुमची वेळ येणार यावर विश्वास ठेवा.
मिथुन आर्थिक राशिभविष्य - समस्येवर तोडगा सापडेल

मिथुन राशीसाठी शुक्रवार ठिक असून ऑफिसमध्येही टीमवर्कच्या मदतीने एखाद्या कठीण समस्येचे समाधान शोधण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सल्ला घ्या. कधी कधी दुसऱ्यांच्या मतानुसार वागणे देखील चांगले असते हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी इतरांची मते ऐकून घ्या, कदाचित त्यातून काही चांगला मार्ग निघेल. घरात वातावरण ठिक असून घरातील काम देखील वेळेत पूर्ण करा.
कर्क आर्थिक राशिभविष्य - संधीचा लाभ घ्या

कर्क राशीसाठी शुक्रवार समाधानकारक आहे. नोकरी असो वा व्यवसाय स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल त्याचा लाभ घ्या. आकाशवाणी एकदाच होते त्याचप्रमाणे संधीपण एकदाच मिळते हे लक्षात ठेवा. काही नवीन शिकण्याचे ठरवले असेल तर नक्की पुढे व्हा. आज सरकारी कामे व्यवस्थित पूर्ण होतील त्यामुळे रिलॅक्स फिल कराल. सगळीकडे वातावरण ठिक असेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य - समस्येवर तोडगा सापडेल

सिंह राशीसाठी शुक्रवारी चांगला आहे कारण एखाद्या कठीण समस्येवर गेल्या काही दिवसांपासून समाधान शोधत होतात त्यात आता तोडगा सापडेल. आज तुम्ही सगळ्यांना मदत करणार आहेत. दिवसभर तुमच्याकडून काही कारणाने मदत आणि सल्ला वाढत जाईल. मोठ्यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. ओळखीच्या व्यक्तीला छोटं कर्ज देवू शकता पण ते परत मिळण्याची हमी मात्र नक्की घ्या. एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून काही काळासाठी दूर जाण्याची वेळ येऊ शकते.
कन्या आर्थिक राशिभविष्य - मेहनत, फोकससह सावध राहा

कन्या राशीसाठी शुक्रवार ठिक असून नोकरी असो वा व्यवसाय काम व्यवस्थित पूर्ण होईल. घरात काही काम खूप दिवसांपासून पेंडींग होते ते आज पूर्ण कराल. अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. दुपारी प्रियजनांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतो. व्यवसायात कोणताही धोका पत्करणे सध्या टाळलेले बरे. कामात फोकस करा तसेच प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवा.
तुळ आर्थिक राशिभविष्य - अनावश्यक खरेदीला आवरा

तुळ राशीसाठी शुक्रवार चांगला आहे कारण जुनी देणी फेडण्यात यशस्वी होणार आहात. कर्जाचा भार उतरल्यामुळे रिलॅक्स फिल कराल. नोकरी- व्यवसायात वातावरण चांगले असेल, तुम्हाला कामाच्या संदर्भात काही नवीन कल्पना सुचत असतील तर त्या लिहून ठेवा. काही आवश्यक वस्तूंची खरेदी करावी लागू शकते. खर्च करताना पाकीटावर ताण येणार नाही याकडे पहावे. खरेदी करताना बजेटकडे नक्की पाहा. सध्या उपयोगी नसलेल्या गोष्टी खरेदी करण्याचे टाळा.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य - कामात घाईगडबड टाळा

वृश्चिक राशीसाठी शुक्रवारी जास्त मेहनत असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. कामात फोकस करा आणि घाईगडबड, निष्काळजीपणा टाळा. ऑफिसचे काम वाढलेले असेल. फोन कॉल्स आणि ईमेल्सना उत्तर देण्यात खूप वेळ जाणार आहे. एखादा जुना मित्र अचानक भेटू शकतो. जर तो तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल, तर आधी तुमच्या बचतीची स्थिती नीट तपासा. तसेच ज्या व्यक्तीला तुम्ही उधार देत आहात तो तुम्हाला कर्जाची रक्कम परत देईल का याची खात्री करुन घ्या.
धनु आर्थिक राशिभविष्य - वादविवाद टाळा, सल्ला लाभदायक

धनु राशीसाठी शुक्रवारी सावध राहण्याचा आहे. घरातील मोठ्यांशी वाद टाळा, त्यांचा सल्ला ऐकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जे काही कराल त्यात संयम ठेवा. ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार मिळतील. एखाद्या क्रिएटीव्ह कामात अधिक रुची घेणार आहात. व्यवसाय प्रोजेक्ट वाढत आहेत तेव्हा टीम वाढविण्याच विचार नक्की करा, तसेच नियोजन आणि व्यवस्थापनावर भर द्या. खरेदीचा योग आहे फक्त बजेटकडे लक्ष द्या. घरात वातावरण ठिक असेल.
मकर आर्थिक राशिभविष्य - प्रमोशनचा योग, कामात प्रगती

मकर राशीसाठी शुक्रवार उत्तम असून ऑफिसमध्ये तुमच्या प्रमोशन किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र, अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. तुम्ही जे काम हाती घ्याल ते उत्साहाने पूर्ण कराल. सकाळपासूनच काम पूर्ण करण्याचा उत्साह दिसेल तसेच कामात वेग वाढलेला असेल. प्रेमसंबंधांमध्ये नाते अधिक मधूर होईल. मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर वेळ चांगली आहे.

