Finance Horoscope 5 July 2026 In Marathi: द्विग्रह योग आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा प्रभाव असल्यामुळे मेष, मिथुन, सिंहसह या राशींसाठी धनलाभ, कामात यश आणि नवीन संधी मिळण्याचे योग, मिथुन, कुंभसह या राशींना नशिबाची साथ लाभेल, वृषभ, कन्यासह या राशींनी संयम, योग्य नियोजन, मेहनतीवर भर द्यावी. तूळ, मीनसह या राशींसाठी रविवार आव्हानात्मक ठरू शकतो.
तुम्ही संयमाने वागा. मेहनत आणि वेळेनुसार नियोजन करा तर काम व्यवस्थित पूर्ण होईल आणि रविवार सकारात्मक असेल. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल सविस्तरपणे पाहूया.
Arthik Rashi Bhavishya 5 July 2026: रविवारी बुध आणि गुरूची युती कर्क राशीत होत असून द्विग्रह योग तयार होत आहे तसेच सर्वार्थ सिद्धि योगाचा प्रभाव देखील सर्व राशींवर असेल. दरम्यान मेष राशीसाठी धनलाभाचे योग, कर्क राशीने ताणतणाव टाळावा, कन्या राशीने व्यवस्थापन परफेक्ट ठेवले तर कौतुक, धनु राशीचे जातक विरोधकांवर मात करतील, कुंभला मेहनतीचे फळ मिळेल तर मीन राशीसाठी व्यवसायातील गुंतवणूक लाभदायक असेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी रविवार कसा असेल, आर्थिक कुंडली काय सांगते, सविस्तरपणे जाणून घेऊया.मेष आर्थिक राशिभविष्य - धार्मिक कार्यावर खर्च करणार

मेष राशीसाठी रविवारी धनलाभाचे योग आहे. राशी स्वामी मंगळ आणि चंद्र दोन्ही द्वितीय कोष केंद्र स्थानात भ्रमण करत आहेत. ज्येष्ठ मंडळींची सेवा करणार असून धार्मिक कार्यांवर देखील खर्च होईल. प्रतिस्पर्धी असो वा विरोधक थोडा त्रास देण्याची शक्यता आहे पण तुम्ही रणनीतीने त्यांच्यावर मात कराल. संयमाने वागा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या समस्या कमी होतील.
वृषभ आर्थिक राशिभविष्य - हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल

वृषभ राशीचा स्वामी सिंह राशीत जाऊन चतुर्थ स्थानात गेला आहे. तेव्हा राजकीय किंवा कामाच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी किंवा विरोधक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही घाई करू नका, हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल केली तर प्रगतीपथावर तुम्हीच असणार आहात. दिवसभरातील काम संपवून संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ व्यतीत करा यामुळे उत्साह वाढेल. लक्षात ठेवा, नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ ठिक नाही.
मिथुन आर्थिक राशिभविष्य - कामात नशिबाची साथ

मिथुन राशीसाठी रविवार सामान्य आहे. राशी स्वामी बुध द्वितीय कोष स्थानात गुरू सोबत आहे. त्यामुळे बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यश मिळू शकते. हाती घेतलेला प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल.
कर्क आर्थिक राशिभविष्य - तणाव वाढेल, सावध राहा

कर्क राशीसाठी रविवार उत्तम असला तरी राशी स्वामी चंद्र तूळ राशीत आहे, अशावेळी जवळची व्यक्ती तुमचा तणाव वाढवू शकते म्हणून सावध राहा. घरगुती शुभ कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा देतील. मुलांच्या विवाहात काही समस्या येत असतील तर त्या दूर होणार आहेत आणि लवकरच घरात सनईचौघडे वाजतील. तुमचा जनसंपर्क अधिक वाढेल त्याचा फायदा व्यवसाय विस्तार होवू शकतो.
सिंह आर्थिक राशिभविष्य - विरोधकांचे षडयंत्र हाणून पाडाल

सिंह राशीसाठी रविवार उत्तम आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून काम वेळेत पूर्ण होईल. विरोधक कितीही प्रयत्न करू देत ते सगळं काही निष्फळ ठरेल. विरोधकांचे प्रत्येक षडयंत्र हाणून पाडाल. घरात असो वा ऑफिसमध्ये संवाद आणि आपापसातील समजुतीने समस्या कमी होतील. काही नवीन ओळखी होणार असून पुढे त्याचे रुपांतर मैत्रीत होईल. घरात सुख समाधान वाढणार आहे. चांगल्या गोष्टींवर खर्च केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.
कन्या आर्थिक राशिभविष्य - व्यवस्थापन परफेक्ट असावे

कन्या राशीसाठी रविवार थोडा आव्हानात्मक आहे. कुंभ राशीमधील चंद्रामुळे अनेक जबाबदाऱ्या उभ्या राहणार आहात, त्या वेळेत पूर्ण कराव्या लागतील. मंगळ हा क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह मानला जातो जो तुमच्या राशीत सक्रिय असल्याने कामाची व्यवस्था परफेक्टच हवी, अन्यथा त्रास तुम्हालाच होईल. सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरणार असून कामाचे कौतुक होईल.
तूळ आर्थिक राशिभविष्य - खर्चात वाढ, मिळकत कमी

तूळ राशीचा स्वामी शुक्र नवम स्थानात तर गुरु कर्कमध्ये दशम स्थानात मार्गी स्थितीत आहे. तुम्ही जास्त मेहनत कराल पण अपेक्षेप्रमाणे फळ मिळणार नाही. मेहनत करूनही मिळकत कमी मिळाल्याने निराशा येवू शकते, सावध राहा. खर्चात वाढ असून कितीही प्रयत्न केले तरी खर्च कमी होणार नाही. गुप्त शत्रू अचानक सक्रिय होतील तसेच निरर्थक धावपळ होवू शकते. घरात देखील तणावाचे वातावरण असेल. दरम्यान तुम्ही घाबरून जावू नका. संध्याकाळनंतर स्थिती ठिक होईल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य - घाईगडबड टाळावी

वृश्चिक राशीसाठी नवम स्थानी गुरु आणि पंचम स्थानी शनि आहे, त्यामुळे रविवार तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. व्यावसायिक डिल तुमच्याबाजूने होण्याचा योग आहे पण त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे विचार योग्यरीत्या मांडले तर येणाऱ्या काळात वरिष्ठ नक्कीच कौतुक करतील. मेहनत आणि फोकस यशाची सुत्र असून निर्णय घेणार घाई नको, शक्य झालं तर सल्ला घ्या.
धनु आर्थिक राशिभविष्य - विरोधकांवर मात करणार

धनु राशीसाठी रविवार चांगला आहे. राशी स्वामी गुरु मिथुन राशीत तर चंद्र वृषभ राशीत षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे. त्यामुळे सरकारी कामाच्या बाबतीत सकारात्मक बातमी मिळेल. आर्थिक लाभाचे योग असून संकटात मित्र मदत करतील. विरोधक कितीही प्रयत्न करु देत तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत. संध्याकाळी शुभ कार्य किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल, प्रियजनांच्या भेटीमुळे मानसिक समाधान मिळेल.
मकर आर्थिक राशिभविष्य - संकटांवर मात करणार

मकर राशीसाठी रविवारी चांगला आहे कारण हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करणार आहात. राशी स्वामी शनि तृतीय स्थानात मार्गी असेल तर चंद्र द्वितीय स्थानात असल्याने संकटांवर सहज मात कराल. काही विद्वान लोकांच्या भेटी होतील यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा असल्याने मालमत्तेच्या संदर्भातील वाद कमी होतील. काम व्यवस्थित पूर्ण होणार आहे पण सावधगिरी बाळगा आणि संध्याकाळी काही अवघड काम हाती घेवू नका.

