Career Horoscope 5 May 2026 In Marathi: अंगारकी संकष्टी चतुर्थीमुळे कोणाचे काम वेळेत पूर्ण होणार? कोणासाठी सकारात्मक मंगळवार? कोणत्या राशींचे काम वेळेत पूर्ण? कोणासाठी नवीन डिल? कोणासाठी सुखसमृद्धीचे योग?
कोणासाठी लाभाचा योग? करिअर, आरोग्य, खरेदी, व्यवसाय, नातेसंबंध, नवीन डिल, प्रमोशन, धनलाभ, नोकरी, आर्थिक स्थिती, मानसिक समाधान, घरातील काम, परदेशवारी याबाबत मेष ते मीन राशीसाठी मंगळवार कसा असेल? ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांच्याकडून जाणून घ्या आर्थिक राशिभविष्याचे याचे सविस्तर विश्लेषण.
Finance Horoscope 5 May 2026 In Marathi: अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ योग असल्यामुळे मेष, वृषभ, मिथुनसह या राशींसाठी मंगळवार सकारात्मक आणि कामात प्रगतीचे योग,सिंह, कन्यासह या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज, या राशींसाठी धनलाभाचे योग तर या राशीच्या जातकांनी वादविवादापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल.चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल ते सविस्तरपणे पाहूया.मेष आर्थिक राशिभविष्य - टीमवर्क यशाचे सुत्र

मेष राशीसाठी मंगळवार चांगला आहे. नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, दुकान तर टीमवर्क हे कामामधील यशाचे रहस्य असणार आहे. समस्येचे समाधान मिळेल फक्त मेहनत जास्त करावी लागेल. आर्थिक स्थिती, करिअर आणि प्रेम यासंदर्भात वेळ सकारात्मक आहे. समोरच्या व्यक्तीचा मूड नक्की कसा आहे त्यानुसार वागणे आणि बोलणे ठेवा काम पूर्ण होईल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्ट वेळेत पूर्ण

वृषभ राशीसाठी मंगळवार शुभ आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र प्रथम स्थानात आहे. तर चतुर्थ स्थानात केतू विराजमान असून पराक्रम स्थानावर शुभ दृष्टी टाकत आहे. शुक्र हा सांसारिक सुखाचा कारक ग्रह असल्याने घरातील वातावरण समाधानाचे असेल. संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ विविध वस्तू खरेदी करण्यात जाणार आहे. कामाच्या बाबतीत वेळ चांगली असून काम पूर्ण होईल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य - प्रतिष्ठेत वाढ, वेळ सकारात्मक

मिथुन राशीसाठी मंगळवार सकारात्मक आहे. कर्जाचा भार कमी झाल्यामुळे रिलॅक्स फिल करणार आहात. तुमच्या सप्तम स्थानातील चंद्र आणि राशीपासून प्रथम स्थानातील मिथुन राशीचा गुरू तुम्हाला मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल. व्यापारातील भागीदार तसेच घरात जोडीदाराची पूर्ण साथ असेल.
कर्क आर्थिक राशिभविष्य - धनलाभाचा योग

कर्क राशीसाठी मंगळवार धनलाभाचा योग घेवून येत आहे. तुमच्या राशीमधील द्वितीय स्थानातील गुरू आणि मकर राशीमधील सप्तम स्थानातील चंद्र यामुळे धनलाभाचा योग आहे. नोकरी असो वा व्यवसाय काही नवीन संबध असतील तर त्यात स्थिरता मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातदेखील यश आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल. खूप दिवसांपासून थांबलेले पैसे मिळू शकतात.
सिंह आर्थिक राशिभविष्य - जबाबदारी वाढणार, सावध राहा

सिंह राशीसाठी मंगळवार ठिक आहे. जन्मकुंडलीत षष्ठम प्रमुख स्थानात चंद्र आणि अष्टम स्थानात शनी आहे तेव्हा नोकरी असो वा व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. क्रिएटीव्ह कामात रुची वाढणार आहे. घरात मुलांच्या विवाहाबदद्ल चर्चा सुरु असतील तर त्यात सकारात्मकता असेल. घरातील वातावरण ठिक असेल.
कन्या आर्थिक राशिभविष्य - विनाकारण वादाची भीती

कन्या राशीसाठी पंचम स्थानात चंद्र भ्रमण करत असून शनि सप्तम स्थानात आहे. या ग्रहस्थिती मित्रांशी विनाकारण वाद होणे, अनावश्यक खर्च होणे अशा गोष्टी घडतील. आजूबाजूचे वातावरण समाधानकारक ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काही बदल होतील पण महिला सहकारी किंवा अधिकारी तुमची मदत करतील. बदल सकारात्मक आहेत. तुम्ही अती विचार करणे कमी करा.
तुळ आर्थिक राशिभविष्य - तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक

तुळ राशीसाठी ग्रहनक्षत्रांचा बदल मंगळवारी सकारात्मक आहे. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा गंभीरपणे विचार करूनच निर्णय घ्या. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक आहे. तुमचा संपर्क प्रतिभाशाली व्यक्तींसोबत होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात बदल घडतील त्याचा फायदा होऊ शकतो. घरातील थांबलेले काम मार्गी लागणार असून ते लवकरच पूर्ण होईल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य - प्रोजेक्ट वेळेत पूर्ण

वृश्चिक राशीसाठी मंगळवार आनंद आणि उत्साह घेवून येत आहे. संध्याकाळी मित्रांच्या भेटीचा योग आहे त्यामुळे मूड फ्रेश होईल. घर असो वा ऑफिस तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करणार आहात. व्यवसायात जे काही काम करत आहात त्याबद्दल सल्ला घ्या, समस्या कमी होतील.
धनु आर्थिक राशिभविष्य - अनावश्यक खर्च कमी करा

धनु राशीसाठी लाभाचे योग घेवून येत आहे. आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून पैशांचा अनावश्यक वापर करु नका. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत होईल. तुमचा शब्द प्रमाण मानला जाईल. घरासाठी काही आवश्यक वस्तूंची खरेदी करणार आहात. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत व्यतीत केल्यामुळे मानसिक समाधान वाढेल.
मकर आर्थिक राशिभविष्य - उधारी घेणे-देणे टाळावे

मकरा राशीपासून दुसऱ्या स्थानातील चंद्र करिअरमध्ये उत्तम यश देणार आहे. घरात विवाहाचा योग जुळून येतोय तेव्हा आर्थिक तजवीज करावी लागेल. व्यवसायात काम मार्गी लागेल आणि ग्राहकांची संख्या वाढेल. उधार घेणे आणि देणे दोन्ही टाळायला हवे. काही कर्ज घेतले असेल तर ते फेडण्यात यश मिळेल.

