अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे याला काही दिवसांपूर्वीच पूत्ररत्न प्राप्ती झाली. त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना कळवली होती. अधोक्षज हा लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा धाटका भाऊ आहे.
अधोक्षजने काही दिवसांपूर्वी बाळ झाल्याचे सांगत लवकरच बाळाचे नाव जाहिर करणार असल्याचे सांगितले होते. तो पर्यंत बाळाला ते नारायण म्हणतील असे देखील त्यांनी ठरवले होते. आता अधोक्षजच्या बाळाचा बारसा अखेर पार पडला आहे.
जेव्हा मुलगा झाल्याची बातमी त्याने सर्वांना कळवलेली त्यावेळी सर्वांना प्रश्न पडलेला की बाळाचे नाव कठीण असेल की सोपे ? कारण कऱ्हाडे कुटुंबात नाव कठीण ठेवण्याचा इतिहास आहे. संकर्षण हे नाव सुद्धा हटके आहे. तर संकर्षणने त्याच्या जुन्या मुलांची नाव पण थोडी कठीण ठेवली आहेत. त्यामुळे अधोक्षजच्या बाळाच्या नावाकडे सर्वांचे लक्ष होते.
अधोक्षजच्या बाळाचा बारसा झाला असून त्याचे अक्षोभ्य असे अनोखे नाव ठेवले आहे. यासोबत त्याने पोस्टमध्ये लिहिले की, लेकराचं बारसं झालं!
नाव: चि. अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे!
अर्थ: जो कधीही क्षुब्ध (अस्वस्थ) होत नाही. मनाने शांत आणि बुद्धीने स्थिर असणारा. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणारा.
आता काही जणांना नाव अवघड वाटत असेल.पण कुठलचं नाव अवघड नसतं अहो. मुद्दा ते नाव घेण्याच्या सवयीचा असतो. म्हणून बघा बरं ५ वेळेला. सहज जमेल! बाकी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहुद्या!
यावर सोशल मीडिया युझर्सच्याही भन्नाट कमेंट येत होत्या. तर काही जण इतकं कठीण नाव ठेवल्याने ट्रोल देखील करत होते. त्यामुळे अधोक्षजने आपलं कमेंट सेक्शन बंद करुन ठेवलं आहे. संकर्षण कऱ्हाडेला पण जुळी मुलं आहेत. त्यांची नाव सुद्धा त्याने सर्वज्ञ व स्रग्वी असे ठेवले आहे.
अधोक्षजच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या कमळी या झी मराठीवरील मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय तो लाडकी विहीण योजना या नव्या कोऱ्या नाटकातही आपल्या अभिनयाची झलक दाखवतोय.

