Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्स होणार बॅन, इंटरनेट वापरताना लागणार वयाचा पुरावा, या देशातील सरकारनं घेतला मोठा निर्णय

अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्स होणार बॅन, इंटरनेट वापरताना लागणार वयाचा पुरावा, या देशातील सरकारनं घेतला मोठा निर्णय

Social Media Rules: मलेशियाने १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर बुलिंग, ऑनलाइन फसवणूक आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचे फायदे किती आहेत, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ही बातमीसुद्धा तुम्ही सोशल मीडियावरच वाचत आहात. पण प्रत्येक गोष्टीची एक वाईट बाजूही असते आणि त्याला सोशल मीडियाही अपवाद नाही. सोशल मीडिया हा माहितीचा सागर आहे असं म्हणतात, पण या माहितीचा चुकीचा वापरही केला जातो. विशेषतः लहान मुलं अनेकदा सायबर बुलिंग, ऑनलाइन फसवणूक किंवा अश्लील माहितीची बळी ठरतात. काही मुलांचे पालकही इंटरनेटच्या बाबतीत मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतील इतके जागरूक किंवा सुशिक्षित नसतात.

या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मलेशियन सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. येत्या १ जूनपासून त्यांनी १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.का घातली जाणार बंदी?

मलेशियामधील कम्युनिकेशन्स अँड मल्टिमीडिया कमिशनने सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत सोशल मीडिया सर्वांसाठी खुला होता. पण काही सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. विशेषतः लहान मुलांची अकाउंट्स हॅक करून त्यांचा गैरवापर केला जात आहे. गेल्या काही काळात मलेशियामध्ये अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

खरं तर फसवणूक मोठ्या लोकांचीही होते. पण लहान मुलांना गंडवणं तुलनेने सोपं असतं. कारण मुलं फार जिज्ञासू असतात. कुठलीही लिंक पाठवली तर ती उत्सुकतेपोटी लगेच क्लिक करतात. आणि याचाच फायदा स्कॅमर्स घेतात. या समस्येवर उपाय म्हणून एज व्हेरिफिकेशन सिस्टम लागू करण्यात येत आहे.
(Brian Ramirez/pexels.com)


सोशल मीडियावर बंदी घालणं योग्य आहे का?​



लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत आणि ते भविष्य सुरक्षित ठेवणं हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य असल्याचं मलेशियन सरकारनं म्हटलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्येही लहान मुलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सबाबत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाचं व्यसन लागू नये, यासाठी ही पावलं उचलली जात आहेत.

असो, पण अशा प्रकारची बंदी घालून सोशल मीडियाचा गैरवापर खरंच रोखला जाऊ शकतो का? काय वाटतं तुम्हाला? तुम्हीदेखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims