आज आपण अंगारकी चतुर्थी विशेष मूग डाळीचे पौष्टिक असे मोदक बनवत आहोत जे अतिशय सोप्या पद्धतीने कमी साहित्यांमध्ये तयार होतात. तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडणारे त्याकरिता व्हिडिओ नक्की बघा ही रेसिपी तेजश्री मुर्कुटे डोखे यांनी ही रेसिपी शेअर केली आहे.

मूग डाळ ही हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक मानली जाते. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. मोदकाच्या स्वरूपात ही डाळ घेतल्याने गोड पदार्थ खाल्ला तरी तो आरोग्यदायी ठरतो.अंगारकी चतुर्थीसारख्या पवित्र दिवशी हा पदार्थ बनवणे म्हणजे भक्ती आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे.
साहित्य

- एक कप मुग डाळ
- एक पिठीसाखर
- अर्धा कप दुधावरील मलाई
- अर्धा कप दूध
- दोन चमचे केसर दूध
- चेरी
मूग डाळ भाजणे

सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि ती कोरडी करून घ्या. त्यानंतर ती हलकी सुवास येईपर्यंत तव्यावर मंद आचेवर भाजा. डाळ जास्त लाल होऊ नये, फक्त हलका सुगंध आला की ती तयार आहे.भाजलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये घ्या आणि त्यात अर्धा कप दूध घालून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. डाळ पूर्णपणे मऊ झाली पाहिजे.




