मुंबई - ज्येष्ठ टीव्ही अभिनेत्री अनिता कंवल यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मुलीच्या इंडस्ट्रीतील वाईट अनुभवांबद्दल सांगितलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिता यांनी सांगितलं की, त्यांनी स्वतःच्या स्वप्नांपेक्षा आपल्या मुलीच्या स्वप्नांसाठी जास्त संघर्ष केला.
यशाच्या शिखरावर असताना तिनं अनेक कामे नाकारली. अनिता यांच्या लेकीनं कास्टिंग काउचचाही सामना केला.
अनिता कंवल यांची मुलगी, पूजा कंवलनं २००४ मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'ऊफ क्या जादू मोहब्बत है' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आणि नंतर 'जवानी जिंदाबाद' आणि 'ब्लू ऑरेंजेस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण, तिला इंडस्ट्रीमध्ये अपेक्षित यश मिळवता आलं नाही. अखेरीस पूजानं अभिनयक्षेत्र सोडलं आणि आता ती इव्हेंट होस्टिंग करते. अनिता म्हणाल्या की, त्यांना आपल्या मुलीचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिता म्हणाल्या की, जेव्हा त्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत होत्या, तेव्हा काही लोक फोन करून त्रास द्यायचे. 'मला असे फोन यायचे, तेव्हा मी त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे. त्यानंतर ते पुन्हा कधीच फोन करायचे नाहीत. काही लोक कॉम्प्रोमाइज आणि बदल्यात मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे. मी त्यांना सांगायचे, 'जर तुम्ही पुन्हा असं म्हणालात, तर मी हैदराबादला येऊन तुमचं तंगड तोडेन.'
अभिनेत्रीच्या लेकीनंही केला कास्टिंग काउचचा सामना
अभिनेत्रीला जगण्याची इच्छा नाही
दरम्यान, अनिता कंवल यांनी 'बनेगी अपनी बात', 'शांती', 'कोरा कागझ', 'केसर' आणि 'कुसुम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

