Dailyhunt
Anita Raj यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले धर्मेंद्र, करिअरच्या शिखरावर अभिनेत्रीनं सोडलेली इंडस्ट्री; आता जगतेय असं आयुष्य

Anita Raj यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले धर्मेंद्र, करिअरच्या शिखरावर अभिनेत्रीनं सोडलेली इंडस्ट्री; आता जगतेय असं आयुष्य

मुंबई - श्रीदेवी, माधुरी दीक्षित, रेखा, हेमा मालिनी, जया प्रदा, मंदाकिनी आणि पूनम ढिल्लन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी ८० आणि ९० च्या दशकात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मोठा चाहतावर्ग निर्माण केला.

त्यांच्यापैकी एक अशी अभिनेत्री आहे जिनं त्या काळात अनेक हिट चित्रपट दिले आणि स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या फिटनेससाठीही ओळखली जात होती. ही अभिनेत्री म्हणजे अनिता राज. अनिता राज यांनी धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, गोविंदा, जितेंद्र, राज बब्बर, शशी कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.

धर्मेंद्र अनिता राज यांच्या प्रेमात होते

अनिता राज या एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यांची कारकीर्द १९८१ ते २००० पर्यंत होती आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली. अनिता राज यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक सिनेमात काम केलं. त्यावेळी धर्मेंद्र यांची दोन लग्न झालेली. मात्र, तरीही ते अनिता राज यांच्या प्रेमात होते. त्यामुळे हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना अनिता यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला.

त्यानंतर काळ बदलला आणि अनिता २००७ मध्ये टेलिव्हिजनकडे परतल्या. आजही अनिता राज मालिकांमध्ये काम करतायत. १९९२ मध्ये दिग्दर्शक सुनील हिंगोराणी यांच्याशी लग्न केल्यानंतर, त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.


अनिता राज यांचा जन्म एका चित्रपट कुटुंबात झाला. त्या जगदीश राज यांची मुलगी असून ते अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी १७७ वेळा इन्स्पेक्टरची भूमिका साकारली. चित्रपटसृष्टीच्या वातावरणात वाढल्यामुळे अनिता यांचा कल अभिनयाकडे वळला.

अनिता राज यांच्या मालिका

अनिता राज यांनी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि लवकरच त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री बनल्या. त्यांनी रोमान्स, अॅक्शन आणि कौटुंबिक ड्रामा यांसारख्या विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर, अनिता राज आता टेलिव्हिजनच्या जगात आपलं वर्चस्व गाजवत आहेत. सध्या अभिनेत्री अनिता 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये कावेरी पोद्दारची भूमिका साकारताना दिसत आहेत. अनिता राज यांनी 'इंद्रजाल' द्वारे टेलिव्हिजन विश्वात प्रवेश केला, पण 'छोटी सरदारनी' द्वारे ओळख मिळवली.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims