Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंक भविष्य, 1 June 2026: मूलांक 1 कामानिमित्त प्रवासाचा योग! मूलांक 7 अहंकाराला दूर करा! जाणून घ्या,अंकशास्त्रानुसार तुमचे राशिभविष्य

अंक भविष्य, 1 June 2026: मूलांक 1 कामानिमित्त प्रवासाचा योग! मूलांक 7 अहंकाराला दूर करा! जाणून घ्या,अंकशास्त्रानुसार तुमचे राशिभविष्य

Numerology Prediction, 1 June 2026: मूलांक 1, 3, 5 सह या मूलांकासाठी कामात यश आणि प्रगतीचे योग, मूलांक 6, 7 सह या मूलांकांनी वादविवाद टाळा आणि तब्येतीकडे लक्ष द्या. या मूलांकांना अचानक धनलाभाचे योग आहेत.

तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी सोमवार कसा आहे?


Ank bhavishya, 1 June 2026: मूलांक 1 कामानिमित्त प्रवासाचे योग, मूलांक 3 संवादकौशल्यामुळे कामात यश मूलांक 5 नशिबाची साथ, कामात यश मूलांक 9 मेहनतीनंतर यश मिळणार, चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी सोमवार कसा असेल?मूलांक 1 - कामानिमित्त प्रवासाचा योग

मूलांक 1 साठी कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसाय किंवा नोकरीत काही बदल करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक असेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा, कारण आयत्यावेळी धावपळ होईल असे दिसते आहे. तुम्ही सोमवारी जास्त सावध राहा कारण एखादी वस्तू हरवण्याची भीती आहे.


मूलांक 2 - मानसिक समाधान वाढेल

मूलांक 2 असणाऱ्यांची सकारात्मक ऊर्जा वाढलेली असेल. गुरुतुल्य व्यक्तीची भेट होऊन मानसिक समाधान वाढवेल. तुम्ही काम करताना उत्साही असाल तसेच कामाचा वेग वाढेल. अनुभवी लोकांचा सल्ला समस्या सोडविण्यासाठी लाभदायक असतो हे लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये मतभेद होईल असे दिसते आहे.


मूलांक 3 - ऑफिसमध्ये जबाबदारी वाढणार

मूलांक 3 साठी संवाद आणि संपर्क ही यशाची सुत्र आहेत. लोकांशी केलेला संवाद आणि संपर्क यामुळे काम पटापट मार्गी लागणार आहे. काहीतरी नवीन करण्याची उत्सुकता जास्त असेल. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून प्रगतीची संधी मिळेल. मेहनतीचे फळ मिळते हे लक्षात ठेवा.


मूलांक 4 - कामात समस्या येणार

मूलांक 4 असणारे कामात जास्त व्यस्त राहणार आहेत. रोजच्या कामांपासून वेगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिल्यामुळे कामात समस्या येवू शकतात. मुलांकडून एखादी खुषखबर मिळेल त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. करिअरमध्ये बदलाचे संकेत असून तांत्रिक ज्ञानाचा लाभ होईल.


मूलांक 5 - कामात नशिबाची साथ

मूलांक 5 साठी नशिबाची साथ असेल. जे काम हाती घेणार ते पूर्ण होणार नोकरी असो वा व्यवसाय कामात यश आहे. काही लोकांसोबत भेटी होतील त्या सकारात्मक असतील त्यामुळे तुमची काही कामं मार्गी लागणार आहेत. भेटीमुळे नवीन माहिती किंवा संधी मिळू शकते. दिवसभर थोडी धावपळ होईल दरम्यान तब्येतीची काळजी घ्या.


मूलांक 6 - वादविवादाची भीती

मूलांक 6 साठी सोमवार थोडा ताणतणावाचा असेल. जुने प्रश्न पुन्हा समोर येऊन त्रास देऊ शकतात. अनावश्यक वाद किंवा नको त्या विषायात वेळ वाया जाणे यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही देवाला गोड पानाचा नैवेदय दाखवा असे केल्यामुळे समस्या थोड्या कमी होतील.


मूलांक 7 - अहंकाराला दूर करा

मूलांक 7 साठी सोमवार धावपळीचा आहे. मुलांमुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. हवामानातील बदलानुसार तुमचा आहार तसेत दैनंदिन काम यात बदल करा. ऑफिसमध्ये काम जास्त असेल, सहकारी मदत करतील त्यासाठी आपुलकिने बोला. अहंकार कमी केल्यामुळे परिस्थिती थोडी सकारात्मक होईल.


मूलांक 8 - थांबलेले काम पुन्हा सुरु होणार

मूलांक 8 साठी सोमवार सकारात्मक असून तुमचा मानसन्मान तसेच लोकप्रियता वाढू शकते. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर कामाचा वेग दुप्पट असेल. थांबलेले जुने काम पुन्हा सुरू होणार आहे त्याचा मोठा फायदा मिळेल. वेळेनुसार नियोजन आणि व्यवस्थापन केले तर जे काम हाती घेणार त्यात यश असेल.


मूलांक 9 - कामात कठोर मेहनत

मूलांक 9 साठी सोमवार थोडा कष्टाचा आहे. अचानक सुरू झालेल्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. सोमवारची सुरूवात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने करा. तुम्ही चांगल्या मनाने काम करता, सगळ्यांना मदत करता पण काही वेळेला तुमच्या बाबतीत चांगले होत नाही, दरम्यान निराश होवू नका. तुमची वेळ येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचे तर अभ्यास आणि स्पर्धात्मक क्षेत्रात चांगले यश दिसते आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims