Numerology Prediction, 7 May 2026: मूलांक 1 असणाऱ्यांनी सावध राहावे, मूलांक 3 खर्चावर नियंत्रण ठेवा, मूलांक 7 प्रवासात सावध राहा, मूलांक 8 ऑफिसमध्ये कौतुक तर मूलांक 9 साठी जीवनातील नवीन बदल सकारात्मक असेल.
तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी गुरूवार कसा आहे?
Ank bhavishya, 7 May 2026: मूलांक 1 सकारात्मक विचार करा, मूलांक 4 संयमाने काम करा, मूलांक 6 व्यवहारिक दृष्टिकोन महत्त्वाचा, मूलांक 8 ऑफिसमध्ये कौतुक मूलांक 9 सावध राहा. चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी गुरूवार कसा असेल?मूलांक 1 - अस्वस्थ व्हाल, सावध राहा

मूलांक 1 साठी गुरूवार घाईगडबड असेल. मनात अनेक विचार येतील किंवा तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे जास्त लक्ष देवून स्वतःला त्रास करुन घेणार आहात. प्रेमाच्या बाबतीत जास्तच भावुक असाल. तुम्हाला सावध रहावे लागेल आणि कामात फोकस करावी लागेल. सकारात्मक विचार करा तसेच योग किंवा ध्यानधारणा केली तर फायदा होईल.
मूलांक 2 - कामात मेहनत जास्त

मूलांक 2 साठी गुरूवार ठिक आहे. भावडांसोबत चांगला वेळ व्यतीत करणार आहात. कुटुंबात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहेत त्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा असेल. ऑफिसमध्ये सहकारी कामात अडचणी निर्माण करु शकतात. सावध राहा तसेच काम पूर्ण करताना फोकस वाढवावा लागेल. थोडी मेहनत जास्त आहे पण त्याचे फळ मिळेल.
मूलांक 3 - खर्चाला आवर घाला

मूलांक 3 साठी गुरूवार ठिक आहे. संवादावर जास्त भर दिला तर मतभेद कमी होतील. काम करण्याच्या पद्धतीत बदल करणार आहात त्यामुळे काम वेगाने पूर्ण होईल. जास्त खर्च करु नका, बजेट पाहा आणि त्यानुसार वागा अन्यथा समस्या येवू शकतात. कोणाला उधार देताना सखोल विचार करा. एखादा मित्र मदत करू शकतो त्यामुळे प्रोजेक्ट किंवा एखादे काम पटकन पूर्ण होईल. सामाजिक कार्यात तुमचा मोठा सहभाग असेल.
मूलांक 4 - काम वेळेत पूर्ण करा

मूलांक 4 साठी गुरूवार मेहनतीचा आहे. ऑफिसमध्ये महिला सहकारी मदत करतील. भावनेच्या भरात काम केले किंवा काही निर्णय घेतला तर समस्या वाढू शकतात. संयमाने वागा आणि स्वतःच्या कामात फोकस करा. इतरांच्या बोलण्यावर जावून लगेच निर्णय घेणे घातक ठरेल. काम वेळेत पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.
मूलांक 5 - बोलण्यावर संयम ठेवा

मूलांक 5 साठी गुरूवार ठिक आहे. घरातील मंडळींचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. ऑफिससोबत घरातील काम पण पटापट मार्गी लावणार आहात. फक्त बोलण्यावर संयम ठेवा. काय होतं, तुम्ही सगळं काही ठिक करता पण पटकन काही बोलता आणि केलेलं काम बिघडतं म्हणून जपून वागा. कामावर जाण्यापूर्वी गाडीची तपासणी करा कारण अचानक गाडी रस्त्यात गाडी बिघडू शकते. कोणाची मस्करी करताना, मस्करीची कुस्करी होणार याची काळजी घ्या.
मूलांक 6 - व्यवहारीपणाला महत्त्व द्या

मूलांक 6 साठी गुरूवार ठीक असून लवलाइफ उत्तम आहे. घरात काही कारणांमुळे समस्या येवू शकते पण दुपारपर्यंत सगळं काही ठिक होईल. भावनांनवर नियंत्रण ठेवून निर्णय घ्या आणि व्यवहारीपणा महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा ताण असेल तो कमी करण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7 - प्रवासात सावध राहा

मूलांक 7 साठी गुरूवार ठिक असून काम पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. काम वाढते आहे पण ते पूर्ण करताना आहार आणि आरामाकडे लक्ष द्या. प्रवास करताना काही अडचणी येतील तेव्हा सावध काहा. व्यवसायात काही नवीन तंत्रज्ञान घेवून येण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्याल. विद्यार्थ्यांना काही नवीन कोर्स करायचा असेल तर पुढे होवू शकतात.
मूलांक 8 - ऑफिसमध्ये कौतुक

मूलांक 8 साठी गुरूवार चांगला असून व्यवसायात लाभाची शक्यता आहे. जोडीदाराच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण कराल. व्यवसाय वाढीसाठी सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. त्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल पण यश मिळेल. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी याचे कौतुक होईल.
मूलांक 9 - नवीन बदल सकारात्मक

मूलांक 9 साठी गुरूवार ठिक असून तुम्ही घरात जास्त वेळ देणार आहात. नोकरीत बॉससोबत मीटिंग होण्याची शक्यता आहे. तुमचे बोलणे शांतपणे ऐकले जावू शकते. जीवनात काही नवीन बदल होण्याची शक्यता आहे, त्याकडे सकारात्मकतेने पाहा. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते, आजही परोपकार कराल. काम करताना सावध राहा आणि येणारी वेळ तुमची आहे हे लक्षात ठेवा.

