Numerology Prediction, 9 April 2026 : मूलांक 1, 5 सह या मूलांकांची आर्थिक प्रगती आणि लाभाचे योग, मूलांक 3, 8 सह या मूलांकासाठी प्रगतीच्या संधी आहेत लाभ घ्या. मूलांक 4 सह या मूलांकांनी जबाबादारीने वागावे.
या मूलांकांसाठी संयम आणि शांत राहणे गरजेचे आहे.सर्व मूलांकांच्या जातकांनी मेहनत, संयम, शांत राहणे, संधीचा लाभ आणि नातेसंबंध जपणे यावर भर दिला तर गुरुवार सुख समाधानाचा असेल. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 01 ते 09 साठी गुरूवार कसा आहे?
Ank bhavishya, 9 April 2026: मूलांक 1 ची आर्थिक स्थिती मजबूत, मूलांक 3 साठी नवीन संधी असून त्याचा लाभ घ्या, मूलांक 5 असणाऱ्यांना नशिबाची साथ, मूलांक 8 साठी जास्त मेहनत पण प्रोजेक्ट वेळेत पूर्ण. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर पाहूया मूलांक 01 ते 09 या मूलांकांसाठी गुरूवार कसा असेल?मूलांक 1 - आर्थिक स्थिती चांगली

मूलांक 1 साठी गुरुवार शुभ असून तुम्ही जे काम करायचे ठरवले आहे ते पूर्ण करणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ चांगली आहे काही देणी किंवा पेमेंट बाकी असेल तर मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करणार आहात पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण सुखासमाधानाचे असून कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतीत करणार आहात.
मूलांक 2 - रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 2 साठी गुरूवार ठिक असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे उधार देणे टाळा. तुम्हाला थोडी आर्थिक चणचण होणार आहे. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. तुमच्या रागाचा कामावर आणि घरातील व्यक्तींवर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. रागाच्या भरात काहीही बोलू नका. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरातील वातावरण सामान्य असेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा कामात असेल.
मूलांक 3 - उच्च शिक्षणासाठी वेळ उत्तम

मूलांक 3 साठी गुरुवार ठिक असून तुम्ही जे काम हाती घेणार ते पूर्ण करणार आहात. तुम्हाला काही उच्च शिक्षण घ्यायचे असेल किंवा परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर योग्य वेळ आहे. घरातील काम सुद्धा मार्गी लावा म्हणजे घरातील वातावरण सुखद असेल. ज्येष्ठांचा सन्मान करा तसेच त्यांची खास काळजी घ्या. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर चर्चा होणार आहे.
मूलांक 4 - वचन पूर्ण करा

मूलांक 4 साठी गुरुवारी कामात थोड्या अडचणी येवू शकतात. बोलताना विचारपूर्वक बोला. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर वेळेत ते पूर्ण करा. तुमची मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. घरातील वातावरण सुखासमाधानाचे असेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल तसेच घरात जास्त वेळ व्यतीत करणार आहात. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
मूलांक 5 - कामात नशिबाची साथ

मूलांक 5 साठी गुरुवार ठिक आहे. तुमच्या कामात नशिबाची साथ असेल. नोकरी अथवा व्यवसायात ज्या योजना आखलेल्या आहेत त्या यशस्वी होतील. आर्थिक लाभ मिळेल तसेच गुंतवणूक फायदेशीर ठरेल, फक्त गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरात आनंदाचे वातावरण असेल. खूप दिवसांपासून तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत होतात, ती खुशखबर मिळण्याचा योग आहे. जोडीदारासोबत संबंध मधूर होतील.
मूलांक 6 - वादाची शक्यता, संयमाने वागा

मूलांक 6 साठी गुरुवार ठिक आहे. नवीन कल्पना सुचतील, पण त्यांचा त्वरित उपयोग करणं यामुळे काहीही फायदा होणार नाही. योजना लिहून ठेवा आणि परिस्थितीनुसार त्याचा वापक करा. कामाच्या ठिकाणी किंवा भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहा आणि कटू शब्द टाळा. रागा कितीही अनावर झाला तरी व्यक्त होवू नका. जोडीदारासोबत वाद टाळा. तुम्हाला शक्य झाले तर अन्नदान करा यामुळे नकारात्मकता आणि समस्या थोड्या कमी होतील.
मूलांक 7 - व्यवसायात लाभाचे योग

मूलांक 7 साठी गुरूवार चांगला आहे. भूतकाळातील निर्णयांचे चांगले परिणाम मिळणार आहेत. ज्या योजना किंवा बदल तुम्ही व्यवसायात केले आहेत त्यात सकारात्मकता दिसून येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही नोकरी असो वा व्यवसाय यात उत्तम काम करता पण यासोबत वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला असेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात समाधान असेल.
मूलांक 8 - प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत

मूलांक 8 साठी गुरुवार ठिक आहे. तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. तुमच्या टीमला प्रोत्साहन द्या आणि काम पटापट पूर्ण करा. व्यवसायात ग्राहक वाढत आहेत त्यामुळे उत्पादनाच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवा. तुम्हाला घरातील प्रत्येक मंडळींचा सपोर्ट असेल. उच्च शिक्षण घेण्याचा किंवा नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे.
मूलांक 9 - संयम, शांतपण यशाची सुत्रे

मूलांक 9 साठी गुरुवार संमिश्र फळ देणार आहे. तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्या. तुम्ही खूप काम करता आणि घरासाठी तुम्हाला खूप काही करायचे आहे पण सध्या वेळ तुमच्याबाजूने नाही. वाद-विवाद टाळा आणि शांत राहा. तुम्ही संयमाने वागणे खूप गरजेचे आहे कारण रागाच्या भरात चूक झाली तर ती सुधारणे कठिण जाते. जोडीदारासोबत वाद घालू नका, त्याला समजून घ्या. संयम आणि शांतपणा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे तसेच तुमची वेळ नक्की येणार आहे.

