Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर पुसद येथे टोळीकडून हल्ला; अभिनेत्यानं सांगितला घडलेला प्रकार

Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर पुसद येथे टोळीकडून हल्ला; अभिनेत्यानं सांगितला घडलेला प्रकार

मुंबई - मराठी अभिनेता अंकुर वाढवेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देतो.

काल अभिनेत्यावर हल्ला करण्यात आला. त्यासंबंधी अंकुरनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं. त्याचबरोबर नेमकं काय घडलं? याबद्दल अंकुर वाढवेनं 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

अंकुर वाढवेची पोस्ट

अंकुर वाढवेनं सोशल मीडियावर पोस्ट करत, त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. अंकुर वाढवेनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, 'काल पुसदमध्ये माझ्यावर 20 ते 30 लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने प्रकरण टळलं. पण यावरून लक्षात येतं की, पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, यावर प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे.'


अभिनेत्यानं सांगितलं काय घडलेलं?

'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'सोबत साधलेल्या संवादात अंकुर वाढवे म्हणाला की, 'पुसदमध्ये एका सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. या सिनेमाचा भाग असणारे माझे मित्र भेटायला आले. त्यात काही जण दारू प्यायलेले होते. त्यातला एक मुलगा आमच्या शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. जास्त काही होऊ नये म्हणून, आम्ही त्याला जायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा एकटा ४० जणांना घेऊन आला. त्यातल्या काही लोकांनी मला ओळखलं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आम्ही ते प्रकरण तिथेच थांबवलं.'



'दुसऱ्या दिवशी मला जाणवलं की, गावामध्ये गुन्हेगारी वाढलीये. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलो. पोलिसांनी त्या तरुणाला बोलावलं. तो तरुण माझी माफी मागायला लागला. मी त्याला एवढंच सांगितलं की, ज्या घरावर तू लघुशंका करत होता, त्या घरातील वहिनींची माफी माग. या संपूर्ण घटनेतून मला एकच सांगायचंय की, पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.'

दरम्यान, अंकुर वाढवेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं 'गावठी' या सिनेमामध्ये आणि 'गेमाडपंती' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims