बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि अभिनेता परमीत सेठी यांचा मुलगा, आयुष्मान सेठी याची नुकतीच क्रेडिट कार्ड प्रकरणात 87,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही घटना अर्चनाचा मोठा मुलगा, आर्यमन सेठी याने त्याच्या 'Aari Vlogs' या YouTube चॅनेलवर नुकताच सांगितला.
सुरुवातीला या घटनेमुळे कुटुंबात थोडे भीतीचे वातावरण होते, तरी अखेरीस सर्वजण हसू लागले. त्यांनी गंमतीने असे म्हटले की, आयुष्मान आता फसवणूक करणाऱ्यांचा "नियमित ग्राहक" बनला आहे; कारण यापूर्वीही अशाच एका घटनेत त्याने 80 हजार रुपये गमावले होते.
आर्यमन सेठीच्या नवीन व्लॉगमध्ये, आयुष्मान स्पष्टपणे गोंधळलेला दिसत आहे. तो म्हणतो, "माझ्या क्रेडिट कार्डमधून 87,000 रुपये काढले गेले आहेत." त्याच्या शेजारी बसलेल्या अर्चनाने त्यावर प्रतिक्रिया दिली, "ते कार्ड ब्लॉक कर! क्रेडिट कार्ड कंपनीला फोन कर."
Free Trial च्या नावाखाली पैशांची फसवणूक
या घटनेबाबत सांगताना आयुष्मानने स्पष्ट केले, "सात दिवसांच्या free trial च्या नावाखाली त्यांनी माझ्याकडून संपूर्ण एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनचे पैसे आकारले." हे ऐकून थक्क झालेल्या अर्चनाने विचारले, "87,000 रुपये?" आणि तिने पुन्हा एकदा सांगितले की, "क्रेडिट कार्ड ब्लॉक कर!" त्याच वेळी आर्यमन मोठ्याने हसू लागला असता, परमीतने मध्येच हस्तक्षेप करत म्हटले, "कार्ड बंद करू नकोस ते पेमेंट रद्द कर!" गोंधळलेल्या आयुष्मानने विचारले की, "तो पर्याय मला कुठे मिळेल?" हे ऐकून, अर्चना आणि परमीत यांच्यासह संपूर्ण कुटुंब हसू लागेल.
आर्यमनने सांगितला आणखी एका फसवणूकीचा किस्सा
आर्यमनला आयुषमानशी संबंधित फसवणुकीचा आणखी एक किस्सा आठवला. त्याने सांगितले, "जेव्हा आम्ही माझ्या 'छोटी बातें' या गाण्यासाठी शूट करायला जागा शोधत होतो, तेव्हा आयुषमानला एक मेसेज आला की त्याच्या 'प्ले-स्टेशन' अकाउंटमधून सुमारे 80,000 रुपये कापले गेले होते. हे पैसे त्याला कधीच परत मिळाले नाहीत."
क्रेडिट कार्ड फसवणूक
सध्या घडलेल्या घटनेबद्दल बोलताना आयुषमानने सांगितले की, "कोणीतरी माझ्या परवानगीशिवाय माझ्या क्रेडिट कार्डमधून पैसे काढून घेतले आहेत. त्यांनी सात दिवसांच्या 'ट्रायल'चा पर्याय दिला होता आणि आश्वासन दिले होते की, शुल्क केवळ सात दिवसांनीच आकारले जाईल. मात्र, त्यांनी माझ्या संमतीशिवायच, संपूर्ण वर्षाचे शुल्क एकाच वेळी कापून घेतले." यावर परमीत म्हणाला, "तुला नेहमीच खूप घाई असते." संतापलेल्या आयुषमानने यावर म्हटले की, "मला काही घाई नव्हती! आणि मी तुमचेच काम करत होतो. तुम्ही लोक ते काम हाताळू शकला नसतात म्हणून मी ते काम करायला घेतले. इथे कोणालाच काही समजत नाही मीच ती गोष्ट स्वतः नीट करेन." आयुषमानच्या उत्तरावर घरातले सगळे हसू लागले.
आयुष्मानला आले रडू!
आर्यमनने मिश्किलपणे म्हटले, "बाबा, तुमचा मुलगा आता मोठा झाला आहे. त्याची फसवणूक झाली आहे." नंतर त्या व्लॉगमध्ये, योगिताने आयुष्मानला विचारले, "तू रडत होतास का?" यावर आयुष्मानने "नाही!" असे उत्तर देत तो व्हिडिओ गेम्स खेळत होता असे सांगितले. आर्यमनने मस्करीत म्हटले की, "तुझे नुकतेच 87000 बुडाले आहेत, आणि तू इथे बसून गेम्स खेळत आहेस?" आयुष्मानने समजावून सांगितले, "माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी सांगितले की रिप्लाय देण्यासाठी त्यांना 48 तास लागतील."
परवानगीशिवाय 87000 रुपये कापले गेले
त्या website नाव विचारले असता, आयुष्मान म्हणाला, "मला माहित नाही. मला सध्या त्याचे नाव आठवत नाहीये. ती संशयास्पद वेबसाइट नव्हती; मी तिचा नियमितपणे वापर करतो. ते पूर्णपणे कायदेशीर आहे. मात्र, सात दिवसांच्या 'फ्री ट्रायल'च्या बाबतीत त्यांनी माझी दिशाभूल केली. सुरुवातीला, त्यांनी शून्य डॉलर्स रकमेचा एक व्यवहार केला, ज्याला मी मंजुरी दिली. त्यानंतर, एका तासानंतर, त्यांनी माझ्या परवानगीशिवाय 87000 कापून घेतले."

