Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashadhi Ekadashi 2026 : विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?

Ashadhi Ekadashi 2026 : विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?

. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाने आषाढीसाठी पुणे-मिरज गाडी २३ ते २९ जुलै दरम्यान दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ८.४० वाजता सुटेल. ती सायंकाळी पावणेसात वाजता मिरज येथे पोहोचेल.

मिरज येथून पुण्यासाठी रात्री साडेनऊ वाजता रेल्वे सुटणार आहे. या गाडीला हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासुद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालागाव, लंगरपेठ, कठवे महांकाळ, सालगरे असे थांबे राहणार आहेत.

पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये नागपूर-मिरज (४ फेऱ्या), नवीन अमरावती-पंढरपूर (४), खामगाव-पंढरपूर (४) आणि लातूर-पंढरपूर (८) अशा एकूण २० फेऱ्यांचा समावेश आहे. या गाड्यांना दौंड, कुर्डूवाडी, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, पंढरपूर यांसह विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

अनारक्षित विशेष गाड्यांमध्ये भुसावळ-पंढरपूर (४), कोल्हापूर-कुर्डूवाडी (१६) आणि पुणे-मिरज (१४) अशा एकूण ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. आरक्षित विशेष गाड्यांचे आरक्षण एक जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर; तसेच 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकीट 'यूटीएस' प्रणालीद्वारे, ॲपद्वारे मिळेल.

दिंड्यांना मिळणार २० हजारांचे अनुदान

आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांमधील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान यंदाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश सरकारने गुरुवारी (दोन जुलै) जारी केला आहे.

दिंड्यांना अनुदान देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून, त्याचा लाभ सुमारे एक हजार ४०० दिंड्यांना होणार आहे. त्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात. दुखापतग्रस्त होतात. एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत काहींचा मृत्यूही होतो; तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही.

विशेष सहाय्य विभागाकडून अनुदान जाहीर

अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडण्यास मदत होईल, अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत होती. या विनंतीला मान देऊन सरकारने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. मागील वर्षी काहीसा विलंब झाला. मात्र, अनुदान वितरित करण्यात आले होते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुदान जाहीर केले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims