Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashnoor Kaur Home: काही महिन्यांपूर्वीच मुंबईत घेतलं अलिशान घर, अभिनेत्रीच्या चार कोटींच्या घरात पाणीच पाणी; व्हिडिओ शेअर करत सांगितलं काय घडलं

Ashnoor Kaur Home: काही महिन्यांपूर्वीच मुंबईत घेतलं अलिशान घर, अभिनेत्रीच्या चार कोटींच्या घरात पाणीच पाणी; व्हिडिओ शेअर करत सांगितलं काय घडलं

मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचले असून सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना याचा फटका बसला बसल्याचं दिसत आहे. आता एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या अलिशान घरातही पाणी शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि 'बिग बॉस १९' फेम अशनूर कौर हिच्या मुंबईतील आलिशान घरात पाणी शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशनूरनं स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर घराचा व्हिडिओ शेअर करत या परिस्थितीची झलक दाखवली आहे.

बाल्कनीतून थेट लिव्हिंग रूममध्ये आलं पाणी
अशनूरनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या घराची झालेली अवस्था स्पष्ट दिसत आहे. पाणी तिच्या घराच्या बाल्कनीला पार करून थेट लिव्हिंग रूमपर्यंत म्हणजेच हॉलमध्ये आलं. संपूर्ण घरात पाणी पाणी झाल्यामुळं एकच तारांबळ उडाली.

नवीन फर्निचरचं नुकसान
अशनूरनं नुकतंच तिच्या घराचं इंटिरिअर केलं होतं. यात तिनं अनेक महागडं फर्निचरही घेतलं होतं. पावसाच्या पाण्यामुळं आता महागडे फर्निचर आणि वस्तू खराब होऊ नयेत म्हणून तिनं तातडीनं मदतनीस बोलवून घरातील पाणी बाहेर काढलं.

हाऊसकीपिंग स्टाफनं केली मदत
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अशनूरच्या घरातील हाऊसकीपिंग स्टाफ आणि इतर सदस्य वाईपर्स, मॉपर आणि व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीनं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हॉलमधील महागडं कारपेट खराब होऊ नये म्हणून ते आधीच गुंडाळून बाजूला ठेवण्यात आलं होतं.

हा व्हिडिओ शेअर करत अशनूरनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, मला एका इव्हेंटसाठी बाहेर पडायचं आहे आणि घरात हे असं झालंय..."त्यानंतर तिने आणखी एक ओळ जोडली, "माझ्यावर लागलेली सर्व 'नजर' आनंद, यश आणि प्रगतीमध्ये बदलू दे.

मुसळधार पावसासोबतच पाईप फाटल्यामुळे झाली दुर्घटना
सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की हे केवळ मुंबईच्या मुसळधार पावसामुळं झालं आहे. मात्र, काही तासांनंतर अशनूरनं सोशल मीडियावर दुसरी पोस्ट शेअर करत खरी परिस्थिती स्पष्ट केली. तिनं सांगितले की, हे पाणी थेट पावसाचे नसून सोसायटीत पाईप फुटल्यामुळे घरात पाणी शिरलं होतं. हाऊसकीपिंग टीमच्या तत्परतेमुळं काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आली आणि घराचे कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, असंही तिनं सांगितलं. तिनं काळजी व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.


१९ व्या वर्षी खरेदी केलं होतं ४ कोटींचे घर

अशनूर कौरनं काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री फराह खानच्या व्लॉगमध्ये तिच्या या आलिशान घराची टूर दिली होती. अवघ्या १९ व्या वर्षी तिनं हे ३. ५ BHK चं घर खरेदी केलं होतं, ज्याची किंमत साधारण ४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येतं.

करिअरबद्दल बोलायाचं झालं तर बालकलाकार म्हणून 'झांसी की रानी' मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात करणारी अशनूर 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'पटियाला बेब्स' सारख्या मालिकांमुळं घराघरांत पोहोचली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims