Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashok and Nivedita Saraf: खऱ्या अर्थाने कपल गोल्स! अशोक मामांनी निवेदितांना दिलेला आशीर्वाद झाला खरा, सिनेमाच्या सेटवर प्रेमाची जाणीव, अन् गोव्यात लग्न

Ashok and Nivedita Saraf: खऱ्या अर्थाने कपल गोल्स! अशोक मामांनी निवेदितांना दिलेला आशीर्वाद झाला खरा, सिनेमाच्या सेटवर प्रेमाची जाणीव, अन् गोव्यात लग्न

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ या अतिशय लोकप्रिय जोडीचा अभिनय प्रवास, अनेक आठवणी, गोड सहजीवन हे सारे चाहत्यांना नेहमीच ऐकायला आवडतं. या स्टार जोडीनं नुकताच लग्नाचा ३७ वा वाढदिवस साजरा केला.

या निमित्तानं पुन्हा एखदा त्या दोघांच्या नात्याबद्दल, त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोललं जातंय.

इच्छित वरप्राप्ती होओ..

अनेक मुलाखतींमध्ये अशोक आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलंय.' धुमधडाका'च्या सेटवर आपले प्रेमसंबंध जुळल्याचं ते सांगतात. या सिनेमातील एका प्रसंगाच्या चित्रीकरणात निवेदिता या अशोक यांना नमस्कार करतात आणि अशोक त्यांना इच्छित वरप्राप्ती होण्याचा आशीर्वाद देतात. तोच आशीर्वाद पुढं प्रत्यक्ष आयुष्यातही खरा ठरला. कारण निवेदिता अशोक यांच्या प्रेमात पडल्या आणि पुढं ते दोघे विवाहबद्ध झाले.

अन् प्रेमाची जाणीव झाली
सेटवर ओळख झाल्यानंतर दोघे चांगले मित्र झाले. पण निवेदिता यांच्यावरील प्रेमाची जाणीव व्हायला अशोक सराफ यांना वेळ लागला. ही जाणीव नेमकी कधी झाली, याच किस्साही अशोक सराफ यांनी सांगितलेला. निवेदिता यांचे वडील अशोक यांचे चांगले मित्र होते. त्यांनीच दोघांची ओळख करून दिली होती. खास किस्सा सांगताना अशोक म्हणाले की, मी १९८८ मध्ये मामला पोरींचा हा चित्रपट करत होतो. त्या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती. काम करताना निवेदिताचं पॅकअप झालं. ती माझ्याजवळ आली आणि तिनं फार सहज पुन्हा भेटू, बाय असं म्हटलं. खरंतर त्यावेळी मला फार वाईट वाटलं होतं. पण मी ते चेहऱ्यावर कुठेही दिसू दिलं नाही. तिने दारातून माझ्याकडे वळून पाहिलं, तेव्हा प्रेमाची जाणीव झाली, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

अशोक आणि निवेदिता यांच्या वयामध्ये १८ वर्षांचे अंतर आहे. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या लग्नाला निवेदिता यांच्या घरून विरोध झाला, असंही अशोक मामांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर घरच्यांनी नमते घेत दोघांच्याही लग्नाला संमती दिली.



अशोक आणि निवेदिता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केलं. हे ठिकाण निवडण्यामागं दोन गोष्टी होत्या. पहिली म्हणजे मंगेशी हे सराफ यांचं कुलदैवत होतं आणि दुसरं म्हणजे याच मंदिरामध्ये या दोघांनी प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळं याच ठिकाणी लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं होतं.

प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीच्या लग्नाला आता ३७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्तानं निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims