मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ हे चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीचा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीच्या कलांनुसार पश्चिम बंगाल भाजप आघाडीवर दिसत आहे. तर तामिळनाडूत थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष हा सर्वाधिक आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे या निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. प्रत्येकाला निकाल जाणून घ्यायचा आहे. तुम्हाला देखील चार जिल्हे आणि पुदुच्चेरीचा निकाल अधिकृतपणे पाहायचा असेल तर तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अधिकृतपणे पाहू शकणार आहात. तुम्ही निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या वेबसाईटवर सहज निवडणुकीचे निकाल पाहू शकणार आहात.
सोप्या पद्धतीने समजून घ्या, कसा निकाल पाहावा?
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल असे लिहिलेले तक्ते बघायला मिळत आहेत. तिथे कुठला पक्ष किती जागांवर आघाडीवर आहे ते स्पष्ट दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटच्या होमपेजवर दिसत असलेल्या आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या तक्त्यांवर क्लिक केले की तुम्हाला त्या त्या राज्याच्या विधानसभेचा मतदारसंघनिहाय निकाल दिसेल.
यामध्ये लीडिंग उमेदवार जिथे लिहिलेलं दिसेल त्याचा अर्थ आघाडीवर असणारे उमेदवार असा आहे. तर ट्रेलिंग उमेदवार म्हणजे पिछाडीवर असणारा उमेदवार असा अर्थ होतो. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे नाव आणि त्याच्या पक्षाचे नाव बघायला मिळेल.
आतापर्यंतचे अधिकृत कल काय?
आसाममध्ये भाजप सर्वाधिक 57 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 19 जागांवर आघाडीवर आहे. तर BOPF पक्ष 8, AGP 6 आणि ASMJTYP पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे.
केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक 50 जागांवर आघाडीवर आहे. तर CPI(M) पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहे. IUML पक्ष 17, CPI पक्ष
13, KEC पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत.
तामिळनाडूमध्ये मोठी उलटफेर होताना दिसत आहे. थलपती विजय याचा पक्ष तब्बल 57 जागांवर आघाडीवर आहे. ADMK पक्ष 48, DMK पक्ष 27, तर काँग्रेस 3 आणि PMK 2 जागांवर आघाडीवर आहेत.

