Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bandu Jadhav : 'माणूस खास, असली शिवसेना मे आया बंडू बॉस', एकनाथ शिंदे यांची परभणीत डायलॉगबाजी

Bandu Jadhav : 'माणूस खास, असली शिवसेना मे आया बंडू बॉस', एकनाथ शिंदे यांची परभणीत डायलॉगबाजी

रभणी : "माणूस खास, विकासाचा ध्यास, असली शिवसेना में आया बंडू बॉस", असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय जाधव यांचे भरभरून कौतुक केले. "खासदार संजय जाधव तुम्हाला परभणीकरांची साथ आहे आणि तुमच्या पाठीमागे एकनाथ शिंदे खंबीर उभा आहे.

त्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही. परभणी जिल्ह्याचा विकास हा होणारच आणि त्यासाठी महायुती सरकार म्हणून भाजप आणि मी स्वतः तुमच्या पाठीमागे खंबीर उभा आहे", असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"बंडू जाधव हा एक दमदार माणूस आणि दमदार खासदार आहे. त्यांची लोकप्रियता एवढी जास्त आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने परभणीकर या सभेला आले आहेत. हे प्रेम आहे. दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे सारखा कमिटमेंट पाळणारा बंडू जाधव आहे", असे उद्गार देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडू जाधव यांच्या विषयी काढले.

परभणी येथील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर शिवसेनेच्यावतीने शेतकरी आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या संवाद मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार सईद खान हे प्रमुख उपस्थित होते.

विरोधात राहून विकासकामे होत नाहीत, शिंदेंचं वक्तव्य

"उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांचा उठाव वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर परभणीच्या जनतेसाठी आहे. कारण विरोधामध्ये राहून कसल्याही प्रकारचा विकास होत नाही. हे या सर्व खासदारांना माहीत होते. म्हणून हे खासदार सत्ताधारी पक्षात मूळ शिवसेनेत आले आहेत. या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली आहे. तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभे आहोत. विकास कोणत्याहीप्रकारे कमी होणार नाही, असा शब्द मी देतो", असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बंडू जाधव यांना शंभर कोटींचा निधी दिला, शिंदेचा दावा

"खासदार संजय जाधव यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांना शंभर कोटी रुपयांचा निधीदेखील दिला आहे. परभणी जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करणार आहोत. परभणी शहरातील भुयारी गटार योजना असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल तो देखील सोडविला जाईल. त्याचबरोबर परभणीसाठी जे क्रीडा संकुल तयार करावयाचा आहे त्यासाठी देखील राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल", असे देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"परभणी जिल्ह्यातील शेतजमीन ही सर्वात चांगली आहे. त्यामुळे शेतीसोबतच जोडधंदा असला पाहिजे आणि त्यामुळेच सिल्क आणि मिल्क ही योजना परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासंदर्भात ठोस पावले उचलणार आहोत", असेदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims