मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये भरत जाधव हे नाव फार मोठ आहे. मी नाव घेताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. त्यांना याची देही याची डोळा पाहणं हे एक प्रकारे सुख आहे असं कित्येक प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
पण तेच भरत जाधव स्टेजवर स्वतःचं नाव आलं की थोडे नर्वस होतात किंवा चिडतात असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का? पण तसं आहे. अभिनेत्री चिन्मयी सुमित या संदर्भातला किस्सा शेअर केला होता.
चिन्मयी सुमीत ही भरत जाधव सोबत अस्तित्व या नाटकामध्ये काम करत होती. हा एक आगळावेगळा प्रयोग होता. जेव्हा स्टेजवर भरत जाधव च नाव वेगळं घेतलं जायचं तेव्हा ते भरतला आवडायचं नाही. यासंदर्भातला किस्सा मुक्काम पोस्ट मनोरंजन या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगताना चिन्मयी म्हणाली की, काम करताना आपण सतत कोणालातरी बघत राहतो.... बरोबरीचे लोक तुम्हाला मदत करतात पण एक डोक्यावर हात लागतो, आदर्श म्हणून बघायला कोणीतरी एक उंच अशी व्यक्ती आयुष्यात लागते ती माझ्यासाठी भरत होती.
नाटकात काम करत असताना बरेचदा माझं अवसान गळायचं. मी म्हणायचे की आता माझ्याकडं नाही होणार... त्यावर तो बोलायचा की होणार होणार सगळं नीट होणार. असं कसं नाही होणार चिन्मयी आपण इतके दिवस सराव केला आहे त्याचा. अशा प्रकारे आपल्या सह कलाकाराला सोबत घेऊन जाणा ही गोष्ट भरत जाधव मध्ये खूप आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे भरत हा मराठी मधला स्टार आहे. स्टेजवर नाव घेताना शेवटी आणि भरत जाधव असं म्हटलं की लोक टाळ्या वाजवतात. त्या नाटकाची अनाउन्समेंट मी करायचे. असंच एकदा रंगीत तालमीच्या वेळेला मी अनाउन्समेंट करत होते तेव्हा सगळी श्रेय नामावली घेत त्यावेळी मी सगळ्या कलाकारांची नाव घेतली व शेवटी म्हणाले की... आणि भरत जाधव. ते ऐकून तो पटकन आला आणि म्हणाला असं नको घेऊस नाव. या नाटकात असं अजिबात म्हणू नकोस आणि भरत जाधव वगैरे... सगळ्यांसारखंच माझंही नाव म्हण.
हे त्यांनी सांगितल्यावर मी थोडीशी हसले कारण मला वाटलं की हे भरत उगीच करत आहे. जेव्हा लोकांच्या टाळ्या येतील तेव्हा त्यालाच मज्जा येईल. त्याच्यानंतर तो मला म्हणालेला की चिन्मयी माझ्या एन्ट्रीला जर टाळी आली ना तर मला खूप वाईट वाटतं. तो खरोखर नर्वस होतो. आतापर्यंत आम्ही 62 प्रयोग केले आहेत त्याच्यातल्या 7-8 प्रयोगांना खच्चून टाळी आलेली भरत जाधवसाठी. आणि त्याच सात-आठ प्रयोगांना त्याला असं वाटायचं की तो हरला आहे. कुठला स्टार हा असा विचार करेल! त्यामुळेच मला भरत खूप ग्रेट वाटतो.

