पश्चिम बंगालमध्ये भाजपाने २०६ जागा जिंकत TMCची १५ वर्षांची सत्ता संपवली. त्यामुळे भाजपा समर्थक खुश आहेत आणि सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. चला पाहूया निवडणूक निकालाच्या निमित्तानं व्हायरल होणाऱ्या काही निवडक पोस्ट.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपाने २०६ जागा जिंकून ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाची १५ वर्षांची सत्ता संपवली. बरं, एवढंच नाही तर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या पराभवावर काही नेटकऱ्यांनी मीम्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. चला तर मग पाहूया व्हायरल होणारे मीम्स.ममता बॅनर्जी यांचा पराभव TMC पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी याच मतदारसंघातून ७०% हून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
सुवेंदू अधिकारी यांनी २०२६ निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. पण लक्षवेधी बाब म्हणजे यापूर्वी ते ममता दिदींचे निकटचे सहकारी मानले जात होते.
भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जात होता. पण भाजपाने त्या ठिकाणी विजय मिळवून ममता यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा ब्रेक लावल्याची चर्चा आहे.
भाजपाने पश्चिम बंगालमध्ये २०६ जागा जिंकल्या, तर TMC पक्षाला केवळ ८० जागांवरच विजय मिळवता आला.
ममता बॅनर्जी यांचा पराभव होताच भाजपा समर्थकांनी झालमुडी म्हणजेच भेळ खाऊन त्यांची फिरकी घेतली.

