Dailyhunt
BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूक

BJP Win Bengal: 'इथेच जन्म, इथेच जगलो अन् इथेच मरणार,' बंगालमध्ये भाजपच्या विजयावर उद्योजक संजीव गोएंका भावूक

Bengal Election Results 2026: आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्सचे मालक आणि मूळचे कोलकात्याचे भारतीय उद्योगपती संजीव गोएंका सध्या चर्चेत आहेत. 4 मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणूक इतिहासातनवीन अध्याय जोडला गेला.

2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव करून विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकून राज्यात सत्तापालटाची त्सुनामी आणली.

या ऐतिहासिक विजयानंतर प्रसिद्ध उद्योगपती आणि RPSG ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोएंका यांनी एक असे विधान केले आहे, ज्याने प्रत्येक बंगाली हृदयाची मने जिंकली आहेत.

भाजपच्या विजयावर संजीव गोएंकांची पोस्ट

लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी भाजपच्या विजयावर एक भावनिक संदेश दिला आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवर बंगालच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याचा आपला मानस जाहीर केला.

गोएंका यांनी X वर लिहिले की, "या अभूतपूर्व निकालामुळे बंगालच्या लोकांची स्वप्ने, आशा आणि आकांक्षा पुन्हा जागृत झाल्या आहेत. मी, बंगालमध्ये जन्मलेला, माझे संपूर्ण आयुष्य येथेच घालवलेला आणि येथेच अखेरचा श्वास घेणारा, या राज्य आणि त्याच्या विकासाशी एक खोल भावनिक नाते जपतो. मला बंगालचा रहिवासी असल्याचा अभिमान आहे आणि मला आशा आहे की, राज्याच्या परिवर्तनशील भविष्यात मी माझी छोटी भूमिका बजावत राहीन."



बंगालमध्ये 'ममता' राज संपुष्टात
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीचे गेल्या 15 वर्षांपासूनचे वर्चस्व मोडून काढत भाजपने 200 जागांचा टप्पा ओलांडून सर्वांना आश्चर्यचकित केले. बंगालमधील औद्योगिक विकास आणि नवीन कार्यसंस्कृतीच्या आशेने बदल घडून आल्याचे मानले जात असून प्रख्यात उद्योगपती संजीव गोएंका यांच्या या वक्तव्यावरूनबंगालचे कॉर्पोरेट जग आता नवीन राज्याच्या निर्मितीसाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. सलग 15 वर्षांच्या सत्तेत राहिल्यावर अखेरीस टीएमसीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

बंगालमध्ये संजीव गोएंकांची भूमिका

सत्तापालटनंतर आता बंगाल एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असताना गोएंका यांची पोस्ट समोर आली आहे. या वक्तव्यातून केवळ राज्याबद्दलचे गोएंकांचे प्रेमच दिसून येत नाही, तर भविष्यात बंगालच्या औद्योगिक विकासासाठी सकारात्मक वातावरणही निर्माण होत असल्याचं दिसत आहे. संजीव गोएंका यांची कंपनी, CESC, आधीपासूनच बंगालला वीजपुरवठा करत असून प्रसिद्ध फुटबॉल क्लब, मोहन बागानचे अध्यक्षही आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims