मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकत्र बाहेर आले.
यावेळी त्यांनी दोघांमध्ये कोणताही वाद झाला नसून हम साथ-साथ हैं, असं म्हटलं. यावेळी सुनील तटकरे यांनी बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, या विषयी माहिती दिली. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपला सुनील तटकरे यांच्यासोबत कोणताही वाद नाही. तसेच टेंडर किंवा कोणत्याही मुद्द्यावरुन खासदार पार्थ पवार यांच्यासोबत आपला वाद झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुनील तटकरे काय म्हणाले?
'विधान परिषदेच्या जागावाटपाचा उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार'
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. उद्या दुपारपर्यंत याबाबत निर्णय होईल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची निवड केली जाईल", असीदेखील माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
छगन भुजबळ काय म्हणाले?

