सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आलेल्या 22 वर्षांच्या एका तरुणीचं आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मे 2024 पासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थिनीचा कोणताही सुगावा लागत नव्हता.
मात्र, तिच्या एका मैत्रिणीने दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीमुळे या प्रकरणाच्या तपासाला अचानक वेगळं वळण मिळालं. हतबल वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात रोहित राजपूत नावाच्या संशयित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरातील एका शेतकरी कुटुंबातील तरुणी मार्च 2024 मध्ये उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली होती. ती क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना 28 मे 2024 रोजी तिचा मोबाईल अचानक बंद झाला. काळजीपोटी पालकांनी हॉस्टेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ती 25 मे रोजीच म्हणजे तीन दिवसांआधीच हॉस्टेलमधून बाहेर पडल्याचं समोर आलं. सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्यानं क्रांती चौक ठाण्यात सुरुवातीला मिसिंगची नोंद करण्यात आली होती.मैत्रिणीच्या एका मेसेजने उकललं गूढ
मुलगी बेपत्ता झाल्यापासून कुटुंबीय हवालदिल होऊन सर्वत्र शोध घेत होतं. यादरम्यान तरुणीच्या एका मैत्रिणीने पालकांशी संपर्क साधून धक्कादायक माहिती दिली. रोहित राजपूत नावाच्या तरुणानं आमिष दाखवून तिला सोबत नेल्याचं या मैत्रिणीनं सांगितलं. या घटनेनंतर रोहित राजपूत हा देखील स्वतःचं घर सोडून अचानक गायब झाला होता. त्याने तरुणीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा दाट संशय पालकांना आला.हतबल पित्याची न्यायालयात धाव अन् हेबियस कॉर्पस
स्थानिक पोलिसांच्या तपासातून ठोस काही निष्पन्न होत नसल्यानं मुलीच्या वडिलांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेत रोहित राजपूत आणि त्याच्या नातेवाइकांना प्रतिवादी करण्यात आलं. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान रोहित किंवा त्याचे नातेवाईक हजर राहिले नाहीत. अखेर न्यायालयातील सुनावणी आणि वाढत्या दबावानंतर तरुणीच्या पालकांनी 25 ऑगस्ट रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रोहित राजपूत याच्याविरोधात तरुणीचं अपहरण करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.झडती घेतल्यावर पुड्या सापडल्या
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ड्रग्जची तस्करी ही एक मोठी गंभीर समस्या आहे. या विरोधात पोलीस आणि एनसीबीकडून दररोज कठोर कारवाई केली जाते. पण तरीही चोरुन ड्रग्जची विक्री केली जाते. अशा चोरुन ड्रग्जची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. आतादेखील अशाचप्रकारची कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडलं आहे.
